Mohammad Shami: पहिल्याच चेंडूवर शमीनं उडवला यंगचा त्रिफळा, कुंबळेच्या वर्ल्डकप रेकॉर्डलाही धक्का

India vs New Zealand: मोहम्मद शमीने चार सामन्यांनंतर भारताकडून वर्ल्डकपमध्ये खेळताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेत मोठा विक्रम केला आहे.
Team India
Team IndiaBCCI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Mohammad Shami Record:

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना रविवारी धरमशाला येथे होत आहे. या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यानेही या संधीचा फायदा घेत एक मोठा विक्रम केला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीला उतरला. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे आणि विल यंग यांनी डावाची सुरुवात केली, मात्र कॉनवेला मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात शुन्यावर बाद केले.

त्यानंतर यंगने रचिन रवींद्रच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. पण 9 व्या षटकात भारताचा कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या हातात चेंडू सोपवला.

Team India
World Cup 2023: मैदान जिंकणारा विराट मन जिंकतो; कारण एकच!

चार सामन्यांनंतर पहिल्यांदाच प्लइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेल्या शमीनेही या संधीचा फायदा घेतला आणि त्याने 9 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विल यंगला त्रिफळाचीत केले. त्यामुळे यंगला 17 धावांवर माघारी परतावे लागले.

दरम्यान, शमीसाठी ही वनडे वर्ल्डकपमधील 32 वी विकेट ठरली. त्यामुळे तो भारतासाठी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. त्याने अनिल कुंबळेच्या 31 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले.

वर्ल्डकपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमीच्या वर अव्वल क्रमांकावर संयुक्तरित्या झहिर खान आणि जवागल श्रीनाथ आहेत. या दोघांनीही 44 विकेट्स घेतल्या आहेत.

  • भारतासाठी वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज -

    • 44 विकेट्स - झहिर खान

    • 44 विकेट्स - जवागल श्रीनाथ

    • 32 विकेट्स - मोहम्मद शमी*

    • 31 विकेट्स - अनिल कुंबळे

Team India
IND vs BAN: वाईड बॉल ड्रामा अन् विराटचे शतक, भारताच्या विजयाच्या क्षणी नक्की घडलं काय?

शमी-सूर्याला संधी

या सामन्यासाठी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या उपलब्ध नव्हता 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यावेळी पायाच्या घोट्याला चेंडू आडवताना दुखापत झाली आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी उपलब्ध नव्हता. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.

त्यामुळे हार्दिक आणि शार्दुल यांच्या जागेवर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादवला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

दोन्ही टीमची प्लेइंग-11

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

  • न्यूझीलंड - डेवॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com