मोईन अली करणार कसोटी क्रिकेटला 'अलविदा'

2914 धावा देखील केल्या आहेत. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने (Moeen Ali) कसोटीत 5 शतके देखील केली आहेत, ज्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या 155 धावा आहे.
Moeen Ali
Moeen AliDainik Gomantak

इंग्लंडचा (England) दिग्गज खेळाडू मोईन अलीने (Moeen Ali) कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ईएसपीएनच्या अहवालानुसार, मोईन लवकरच हा निर्णय जाहीर करणार आहे. अलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत 64 कसोटी सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने 195 विकेट्स घेतल्या आहेत. 2914 धावा देखील केल्या आहेत. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने कसोटीत 5 शतके देखील केली आहेत, ज्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या 155 धावा आहे. अलीने स्वत: ला कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला असून जेणेकरुन तो छोट्या फॉर्मेटमध्ये आपले पूर्ण केंद्रित करु शकले. त्याने आपल्या निर्णयाची माहिती इंग्लंड बोर्ड (England Board) आणि कसोटी कर्णधार जो रुटलाही (Captain Joe Root) दिली आहे.

Moeen Ali
IPL 2021: चहल,मॅक्सवेलची फिरकी तर हर्षलची हॅट्रीक, RCBच्या गोलंदाजांसमोर MI गारद !

मोईन सध्या आयपीएलमध्ये सीएसकेच्या (CSK) संघाचा सदस्य असून त्याने केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याच्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वास्तविक मोईन आगामी टी -20 विश्वचषकात इंग्लंडकडून खेळताना दिसू शकतो. याशिवाय एशेज मालिकेसाठीही त्याची निवड होऊ शकते. अशा परिस्थितीत त्याला आपल्या कुटुंबापासून बराच काळ दूर राहावे लागू शकते. हा विचार मनात ठेवून मोईनने कसोटीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीची गणना इंग्लंड क्रिकेट संघातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. इंग्लंडच्या या खेळाडूने आपला शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला होता. ऑक्टोबरपासून टी -20 विश्वचषक सुरु होणार आहे. इंग्लंडचा संघ टी -20 विश्वचषक विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com