PAK Vs ENG: पाक दौऱ्यावर पाकिस्तानी वंशाचा 'हा' खेळाडू करणार इंग्लंडचे नेतृत्व

Star All-Rounder Moeen Ali: स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली आगामी पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंड टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Star All-Rounder Moeen Ali
Star All-Rounder Moeen AliDainik Gomantak
Published on
Updated on

Star All-Rounder Moeen Ali: स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली आगामी पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंड टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पाकिस्तानी वंशाचा मोईन नियमित कर्णधार जोस बटलरच्या अनुपस्थितीत T20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेत बटलरला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत तो पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही. इंग्लंड पाकिस्तान दौऱ्यावर 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत कराची आणि लाहोरमध्ये सात सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. मोईन गेल्या वर्षी T20 विश्वचषक आणि 2019 मध्ये प्रथमच विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.

द गार्डियनमधील वृत्तानुसार, इयॉन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर बटलरने यावर्षी व्हाईट बॉलच्या क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाचे कर्णधारपद स्वीकारले. दुखापतीनंतर मोईन अली (Moeen Ali) पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंड संघाचे नेतृत्व करेल. मोईनने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडचा संघ 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा करणार आहे. इंग्लिश संघाने यापूर्वी 2005 मध्ये शेवटच्या वेळी पाकिस्तानचा दौरा केला होता.

Star All-Rounder Moeen Ali
Ind Vs Pak: पाकिस्तानचा पुन्हा पराभव होणार! आशिया चषकात भारत-पाक पुन्हा आमने-सामने येणार

गेल्या वर्षी, इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा (Pakistan) दौरा करणार होता, परंतु न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव दौरा रद्द केल्याने इंग्लंडनेही आपला दौरा रद्द केला होता. इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळून आगामी T20 विश्वचषकाची तयारी मजबूत करु इच्छितो. सात सामन्यांच्या T20 मालिकेनंतर, इंग्लंड (England) पुन्हा डिसेंबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करेल, जिथे त्यांना तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com