IND VS AUS: सराव सामन्यातच मितालीसह स्मृती मंधनाची निराशाजनक कामगिरी

कर्णधार मिताली राज आणि सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सारख्या वरिष्ठ फलंदाजांना सामन्यात अद्याप कोणताही प्रभाव पाडता आलेला नाही.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) च्या मोसमात सर्व खेळाडू आपापल्या फ्रँचायझींमध्ये व्यस्त आहेत. परंतु मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women Cricket Team) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) आपला मोर्चा खोलला आहे. भारतीय संघ एकदिवसीय, कसोटी आणि टी -20 मालिकेसाठी (T-20 series) ऑस्ट्रेलियात आहे, परंतु सुरुवातीच्या सामन्यात संघाला उत्तम प्रदर्शन करता आलेले नाही. एकदिवसीय मालिकेपूर्वीच झालेल्या सराव एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 36 धावांनी पराभव केला. यासह, प्रशिक्षक रमेश पोवार (Ramesh Powar) आणि कर्णधार मिताली राज (Captain Mithali Raj) यांना या मालिकेत येणाऱ्या कठीण आव्हानाची पहिली झलक मिळाली. कर्णधार मिताली राज आणि सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सारख्या वरिष्ठ फलंदाजांना सामन्यात अद्याप कोणताही प्रभाव पाडता आलेला नाही.

India Women Cricket Team
ENG vs IND: ईसीबीला नुकसान भरपाई देण्यासाठी BCCIची मोठी ऑफर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका 21 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्याआधी, शनिवार 18 सप्टेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये दोन्ही संघांमध्ये एक सराव सामना खेळला गेला, ज्यामध्ये दोन्ही बाजूंच्या जवळजवळ सर्व प्रमुख खेळाडूंनी स्वताच्या खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने रॅचेल हेन्स (65), कर्णधार मेग लॅनिंग (59) आणि बेथ मुनी (59) यांच्या उत्कृष्ट डावांच्या मदतीने 9 गडी गमावून 278 धावांची मजबूत धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 242 धावा करु शकला आणि अखेर 36 धावांनी सामना गमावला.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दमदार कामगिरी

ब्रिस्बेनच्या इयान हिली ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने एलिसा हिलीला (08) लवकर बाद करून पहिला धक्का दिला, परंतु भारतीय संघाला फारसा फायदा झाला नाही, कारण हेन्स आणि लॅनिंगने चांगली भागीदारी करुन संघाला 100 धावा उभारल्या. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकरने हेन्सला बाद करत ही भागीदारी ब्रेक लावला. अष्टपैलू खेळाडू एलिस पॅरी (01) यष्टीचीत झाली. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या चार विकेटवर 136 धावा होत्या.

येथून अॅशले गार्डनर (24) ने मूनीसह पाचव्या विकेटसाठी 63 धावा जोडल्या. शेवटी, अॅनाबेल सदरलँड (14 चेंडूत 20) आणि जॉर्जिया वेअरहॅम (15 चेंडूत नाबाद 17) यांनी महत्त्वपूर्ण धावा जोडल्या आणि 50 षटकांत 278 धावांचे आव्हान दिले. अनुभवी फिरकी गोलंदाज पूनम यादव (3) आणि झुलन गोस्वामी (2) भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले.

India Women Cricket Team
Ind Vs Pak Cricket: भारतासोबत द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करणे अशक्य

टॉप ऑर्डर फेल झाली, लोअर ऑर्डरने डाव सावरला

प्रत्युत्तरात भारताची सुरुवातही चांगली झाली नाही. युवा सलामीवीर शेफाली वर्मा (27) आणि रिचा घोष (11) लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले. ज्येष्ठ फलंदाज स्मृती मंधाना (14) आणि कर्णधार मिताली राज (01) यांनाही आपली विकेट वाचवता आली नाही. एलिस पॅरीने दोघीनांही बाद केले. पेरीसोबत गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणाऱ्या 19 वर्षीय स्टेला कॅम्पबेलने पहिल्या 15 षटकांत भारताला 4 धक्का दिला.

येथून 21 वर्षीय यास्तिका भाटिया (41) चमकदार फलंदाजी करताना धावसंख्येचा चढता क्रम ठेवला, परंतु ती फिरकीपटू सोफी मौलिनाऊचा बळी ठरली. भारताने केवळ 106 धावांवर 6 गडी गमावले होते. येथून लोअर ऑर्डरची अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि लोअर ऑर्डर फलंदाज वस्त्रकर यांनी संघाला लक्ष्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. दीप्तीने 49 धावा केल्या, तर संघाचा वेगवान गोलंदाज वस्त्राकरने सर्वाधिक 57 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅलिस पॅरीने 2 आणि कॅम्पबेलने 3 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com