Mitchell Starc Video: मोठ्या मनाचा स्टार्क! पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर छोट्या फॅनला दिलेलं वचन केलं पूर्ण

Mitchell Starc Video: मेलबर्न कसोटीवेळी स्टार्कने स्टेडियममधील चाहत्याला दिलेलं वचन पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पूर्ण केले.
Mitchell Starc
Mitchell StarcX/CricketAus
Published on
Updated on

Mitchell Starc fulfilled his promise to young fan after Australia win against Pakistan in Melbourne Test:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील मेलबर्नला झालेला दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने ७९ धावांनी जिंकत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात मिचेल स्टार्कच्या एका कृतीने करोडो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

झाले असे की या सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 317 धावांचे आव्हान ठेवले होते. चौथ्या दिवशी पहिल्या सत्राअखेर पाकिस्तानने या आव्हानाचा पाठलाग करताना 9 षटकात 1 बाद 25 धावा केल्या होत्या.

Mitchell Starc
AUS vs PAK, Video: कमिन्स-कॅरे पळाले चक्क 5 धावा, पाकिस्तानचा फिल्डिंगमध्ये सावळा गोंधळ

त्यावेळी पहिल्या सत्रानंतर मिचेल स्टार्कने स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या एका छोट्या चाहत्याला शब्द दिला होता की जर ऑस्ट्रेलियाने या दिवसाच्या उर्वरित दोन सत्रात पाकिस्तानच्या 9 विकेट्स घेतल्या, तर तो त्याचे शुज स्वाक्षरी करून त्याला भेट देईल.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी पाकिस्तानच्या उर्वरित 9 विकेट्स घेत सामनाही जिंकला. त्यामुळे स्टार्कनेही त्याचे वचन पाळले आणि त्याने त्या छोट्या चाहत्याला स्वाक्षरी करून शुज भेट दिले. याशिवाय त्याने त्या चाहत्याबरोबर फोटोही काढले. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

Mitchell Starc
AUS vs PAK: पाकिस्तानला धोबीपछाड! ऑस्ट्रेलियाकडे विजयी आघाडी; बॉक्सिंग डे कसोटीत कमिन्सच्या 10 विकेट्स

या सामन्यात पाकिस्तानचा संघ चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 67.2 षटकात 237 धावात सर्वबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजयावर शिक्कामोर्तब केले. या डावात स्टार्कने 4 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 84.1 षटकात 262 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे पहिल्या डावातील 54 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 317 धावांचे आव्हान ठेवले होते.

या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 96.5 षटकात सर्वबाद 318 धावा केल्या होत्या. तसेच पाकिस्तानने नंतर 73.5 षटकात सर्वबाद 264 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com