Suryakumar Yadav: मैदान गाजवणाऱ्या 'Mr 360' ची लाइफस्टाइल नेमकी कशी, जाणून घ्या

Surya Kumar Yadav Family: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या 'मिस्टर 360' सूर्यकुमार यादवच्या तुफानी फलंदाजीचे सर्वजण कौतुक करत आहेत.
Suryakumar Yadav Family
Suryakumar Yadav Family Dainik Gomantak

Suryakumar Yadav Batting: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या 'मिस्टर 360' सूर्यकुमार यादवच्या तुफानी फलंदाजीचे सर्वजण कौतुक करत आहेत. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी करत श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारा सूर्यकुमार यादव वैयक्तिक आयुष्यातही खूप स्टायलिश आणि खूप आलिशान आयुष्य जगतो. सूर्यकुमार यादवची लाइफस्टाइल नेमकी कशी आहे, त्याबद्दल जाणून घेऊया...

दरम्यान, जगातील नंबर 1 टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे आलिशान अपार्टमेंट चेंबूर, मुंबई (Mumbai) येथील अनुशक्ती नगर येथे आहे. येथे तो पत्नी आणि संपूर्ण कुटुंबासह राहतो. सूर्यकुमार यादव हा अतिशय धार्मिक आहे. त्याच्या लक्झरी अपार्टमेंटमध्ये एक मोठा दिवाणखाना, जेवणाचे खोली, दोन मोठे शयनकक्ष आणि एक गेमिंग रुम आहे.

Suryakumar Yadav Family
Suryakumar Yadav: भारताच्या 'मिस्टर 360'ला 'बेबी एबी'कडून शिकायचाय 'तो' स्पेशल शॉट, पाहा व्हिडिओ

तसेच, त्याच्या घरात सोनेरी रंगाच्या भिंती आहेत, त्यामुळे घराला छान लुक मिळतो. सूर्यकुमारची एकूण संपत्ती सुमारे 4 मिलियन डॉलर म्हणजेच 30 कोटी रुपये एवढी आहे. मैदानावर धावांचा वर्षाव करण्यासोबतच सूर्या स्वत:ला तंदुरुस्त ठेवतो. त्याच्या घरात एक छोटी जिमही आहे. सूर्याच्या घराच्या मुख्य गेटवर एक मोठी बॅट आहे, जी केवळ क्रिएटिव्हच नाही तर पाहुण्यांनाही आवडते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com