Indian Premier League 2022: गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकला एक विकेट मिळाली असली तरी, त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना घायगुतीला आणले. त्याच्या बाऊन्सरवर गुजरातच्या (Gujarat Titans) फलंदाजांची दाणादाण उडाली. गुजरातविरुद्धच्या सामन्यादरम्यान उमरानने (Umran Malik) 153 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकून केवळ चाहत्यांनाच नाही तर फलंदाजांनाही चकित केले. त्यानंतर सोशल मीडियावर उमरानच्या चाहत्यांनी कौतुक करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही (Michael Vaughan) मलिकचे कौतुक केले. सोशल मीडियावरील ट्वीटरवरुन ट्वीट करत वॉनने म्हटले की, 'मी जर बीसीसीआयमध्ये (BCCI) असतो तर त्याला यावेळी काऊंटी क्रिकेट खेळायला पाठवले असते. जेणेकरुन त्याला आपल्या गोलंदाजीत आणखी सुधारणा करता आली असती.' (Michael Vaughan has praised Umran Malik's bowling)
दरम्यान, मूळचा जम्मू आणि काश्मीरचा असलेल्या उमरानने या सीझनमध्ये आत्तापर्यंत फक्त 3 विकेट घेतल्या आहेत. परंतु त्याची गोलंदाजी भल्याभल्या फलंदाजांना गारद करत आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यादरम्यान मॅथ्यू वेड बाद करण्यात उमरानला यश आले. त्याने 4 ओव्हरमध्ये 39 धावा दिल्या असल्या तरी त्याच्या गोलंदाजी कमाल करत आहे. मलिकच्या वेगवान आणि घातक बाउन्सरने चाहत्यांना चकित केले आहे.
याशिवाय, या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने शानदार अर्धशतकी खेळी केली. निकोलस पूरनच्या अखेरच्या षटकात शानदार फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सचा आठ गडी राखून पराभव करत हैद्राबादने सलग दुसरा विजय नोंदवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.