Kieron Pollard: मुंबई इंडियन्ससाठी न्युयॉर्कमध्ये पोलार्ड कर्णधाराच्या भूमिकेत! पाहा संघ

मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डला नवी जबाबदारी दिली आहे.
Kieron Pollard
Kieron PollardDainik Gomantak
Published on
Updated on

MI New York announce Kieron Pollard as a captain: अमेरिकेमध्ये 13 जुलैपासून मेजर क्रिकेट लीग स्पर्धा खेळवली जाणार आहे. हा या स्पर्धेचा पहिलाच हंगाम आहे. या हंगामासाठी मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या एमआय न्यूयॉर्कने कर्णधार आणि संपूर्ण संघाची घोषणा केली आहे.

एमआय न्यूयॉर्क संघात एकूण 18 खेळाडूंचा समावेश असून यात 9 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. या संघाचे कर्णधारपद दिग्गज कायरन पोलार्डकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या संघाच राशिद खान, निकोलस पूरन, ट्रेंट बोल्ट, टीम डेव्हिड, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, कागिसो रबाडा, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड विसे अशा खेळाडूंचा समावेश आहे.

कोचिंग स्टाफ

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू रॉबिन पीटरसन या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. तसेच लसिथ मलिंगा गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. जे अरुण कुमार फलंदाजी प्रशिक्षक आणि जेम्स पेमंट क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असणार आहेत.

पोलार्डची कामगिरी

पोलार्डचे मुंबई इंडियन्सबरोबरचे नाते अनेक वर्षांपासूनचे आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 10 वर्षांहून अधिक काळ खेळला आहे. तसेच त्याने आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे एकूण 9 सामन्यांमध्ये नेतृत्वही केले असून 5 विजय आणि 4 पराभव स्विकारले आहेत.

त्याने 189 आयपीएल सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सकडून 16 अर्धशतकांसह 3412 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 69 विकेट्स घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे पोलार्डने आयपीएल 2023 स्पर्धेपूर्वी आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. पण असे असले तरी त्याने या हंगामात मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

मेजर क्रिकेट लीग 2023

मेजर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेचा पहिला हंगाम 6 संघांमध्ये खेळवला जाणार असून 16 सामने होणार आहेत. ग्रँड प्रेरी स्टेडियम आणि चेर्स स्ट्रीट पार्क या दोन मैदानांवर हे सामने होणार आहेत. अंतिम सामन्यासह प्लेऑफमधील सर्व सामने ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहेत.

एमआय न्यूयॉर्क संघ - कायरन पोलार्ड (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, राशिद खान, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड विसे, कागिसो रबाडा, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, स्टिव्हन टेलर, हमिड अझम, एहसान आदील, नोस्तुश केंजिगे, मोनांक पटेल, सबरजीन लड्डा, शयन जहांगिर, काईल फिलिप, साईदीप गणेश

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com