IND vs PAK: 'तर वूल्मरसारखे हाल होतील...', पाकिस्तानी क्रिकेटरने डायरेक्टरला दिलेल्या धमकीने उडवली खळबळ

Abdul Razzaq: पाकिस्तान क्रिकेट संघाच्या डायरेक्टरला माजी क्रिकेटपटूने धमकीवजा ताकीद दिली आहे.
India vs Pakistan | Abdul Razzaq
India vs Pakistan | Abdul Razzaq

ICC Cricket World Cup 2023, India vs Pakistan, Abdul Razzaq:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला.

मात्र, या सामन्यात पराभव झाल्याने पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे. अगदी पाकिस्तानच्याच माजी क्रिकेटपटूंनीही संघावर ताशेरे ओढले आहेत. परंतु, यातही माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने केलेल्या वक्तव्यांने खळबळ उडाली आहे.

रझाकने पाकिस्तान संघाचे सध्याचे संचालक मिकी आर्थर यांना पाकिस्तानमधील प्रसिद्ध टीव्ही चॅनेलवरील लाईव्ह शोमध्ये धमकीवजा ताकीद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की पाकिस्तानमध्ये त्यांचे हाल बॉब वूल्मरप्रमाणे होतील.

India vs Pakistan | Abdul Razzaq
IND vs PAK सामन्यात वाद! महिला पोलीस कर्मचारी अन् प्रेक्षक यांच्यात मारामारी, व्हिडिओ व्हायरल

43 वर्षीय अब्दुल रझाकने लाईव्ह शोममध्ये म्हटले की 'पाकिस्तानमध्ये जे हाल बॉब वूल्मर यांचे झाले, अगदी तसेच हाल होतील. तुम्ही वर्ल्डकप खेळायला आला आहात, तर तुम्हाला कामगिरी करावी लागेल. मला तर वाटते की ज्या-ज्या लोकांमुळे पाकिस्तान सामना हरला आहे आहे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि घरी जायला हवे.'

पाकिस्तानची बॉडी लँग्वेज कधीही अशी नव्हती. त्यांच्याकडे चांगले गोलंदाज नव्हते आणि चांगले फिरकीपटूही नव्हते. एका साधारण खेळपट्टीवर चेंडू येत होता. तुम्ही आता त्या ठिकाणी पोहोचला आहात की तुम्हाला कामगिरी करून दाखवावी लागेल.'

'इथे क्रिकेटमध्ये आता सॉफ्टनेसच्या गोष्टी संपल्या आहेत. तुम्ही तुम्हाला सुरक्षित करण्यासाठी आणि नोकरी वाचवण्यासाठी स्टेटमेंट केले आहेत.'

रझाकच्या या व्यक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे, कारण २००७ वनडे वर्ल्डकप दरम्यान पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा रहस्यमयी मृत्यू झाला होता. किंग्टन येथील हॉटल रुममध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. दरम्यान, आता रझाकने वूल्मर यांचे नाव घेत केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्याच्या या व्यक्तव्यामुळे नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.

India vs Pakistan | Abdul Razzaq
World Cup 2023: अफगाणिस्तानचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला 'हा' कारनामा

काय म्हणाले होते आर्थर?

भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर आर्थर यांनी केलेले व्यक्तव्याचीही बरीच चर्चा झाली होती. त्यांनी स्टेडियममध्ये लाखाहून अधिक भारतीय समर्थक असल्याबद्दल म्हटले होते की, 'हे पाहा, जर मी असे म्हटलो की त्याने काही फरक पडला नाही, तर मी खोटे बोलेल.'

'ही स्पर्धा आयसीसीची आहे असे वाटले नाही, हे कटू सत्य आहे. ही एक द्विपक्षीय मालिका वाटली. ही बीसीसीआयची स्पर्धा वाटली. मी दिल दिल पाकिस्तान गाणे स्टेडियममध्ये ऐकलेच नाही. त्यामुळे हो, त्या गोष्टीचा परिणाम होतो, पण मी ते पराभवाचा कारण म्हणून वापरणार नाही.'

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 30.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com