World Dwarf Games: मार्क धर्माईने रचला इतिहास! सुवर्णपदकासह तब्बल 5 मेडल्सची केली कमाई

Mark Dharmai: भारताचा पॅरालम्पिक खेळाडू मार्क धर्माईने वर्ल्ड ड्वार्फ गेम्स स्पर्धेत सुवर्णपदकासह ५ पदके जिंकली आहेत.
Mark Dharmai
Mark Dharmai Dainik Gomantak

Mark Dharmai Win Gold Medal at World Dwarf Games:

भारताचा पॅरालिम्पिक खेळाडू मार्क धर्माईने नुकताच मोठा विश्वविक्रम रचला आहे. जर्मनी येथे वर्ल्ड ड्वार्फ गेम्स स्पर्धा पार पडली. 28 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत मार्क धर्माईने बोस्किया या क्रीडा प्रकारात दुहेरीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

त्यामुळे तो वर्ल्ड ड्वार्फ गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इतकेच नाही तर मार्कने याच स्पर्धेत आणखी 4 पदके जिंकली आहेत.

त्याने थाळी फेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले, तसेच बॅडमिंटनमध्ये दुहेरीतही त्याला रौप्य पदक मिळाले. याशिवाय त्याने बॅडमिंटनमध्येच एकेरीत कांस्यपदक जिंकले आणि भालाफेक स्पर्धेतही त्याने कांस्य पदकाला गवसणी घातली.

Mark Dharmai
Asia Cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशला Super-4 मध्ये पराभवाचा धक्का, आव्हानही जवळपास संपुष्टात

वर्ल्ड ड्वार्फ गेम्स स्पर्धेत एकूण 22 विविध देशातील 505 खेळाडू सहभागी झाले होते. ही 8 वी वर्ल्ड ड्वार्फ गेम्स स्पर्धा होती. या स्पर्धेतील खेळ जर्मनीतील कोलोन येथे जर्मन स्पोर्ट्स युनिवर्सिटी येथे पार पडले.

या स्पर्धेत मुंबईतील वांद्र्यात राहणाऱ्या मार्कने शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अगदी लहानपणापासूनच मार्कला खेळाची आवड लागली होती, त्यामुळे तो विविध खेळांमध्ये पारंगत होऊ लागला. त्याने 2004 साली झालेल्या पॅरालिम्पिक खेळातही सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याने 400 मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकले होते.

Mark Dharmai
US Open: 19 वर्षीय कोको गॉफ नवी चॅम्पियन, फायनलमध्ये सबालेंका पराभूत

एवढेच नाही, तर 2012 पॅरालिम्पिकमध्येही सहभाग नोंदवला. त्याने त्या स्पर्धेत 4x400 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते. तसेच 2010 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आलेल्या लॉकडाऊनच्या संकटामुळे वर्ल्ड ड्वॉर्फ गेम्स ही स्पर्धा पुढे ढकलली जात होती. या काळात त्याने फिजिओथरपी आणि योगा यांच्या मदतीने स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या यशाचे कौतुक म्हणून ब्रँड्रा जिमखानाने त्याला मानद आजीवन सदस्यत्व बहाल केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com