Asia Cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशला Super-4 मध्ये पराभवाचा धक्का, आव्हानही जवळपास संपुष्टात

SL vs BAN: आशिया चषकात श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला असून सुपर फोरमधील पहिला विजय नोंदवला.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023 Super Four Sri Lanka win against Bangladesh by 21 runs:

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध 21 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशचा हा सुपर फोरमधील सलग दुसरा पराभव आहे. त्यामुळे आता त्यांचे अंतिम सामन्यात पोहण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशसमोर विजयासाठी 258 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 48.1 षटकात सर्वबाद 236 धावा करता आल्या.

बांगलादेशकडून मोहम्मद नाईम आणि मेहदी हसन मिराजने चांगली सुरुवात केली होती. या दोघांनीही सलामीला 55 धावांची भागीदारी केली. मात्र, दोघांनाही श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाने माघारी धाडले. नाईम 21 धावांवर आणि मिराज 28 धावांवर बाद झाले.

त्यानंतर लिटन दास (15) आणि कर्णधार शाकिब अल हसनही (3) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर मुशफिकूर रहिम आणि तोहित हृदोय यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करताना बांगलादेशला दिडशे धावांचा टप्पा पार करून दिला होता. मात्र, मुशफिकूर 29 धावांवर शनकाविरुद्धच बाद झाला.

Sri Lanka
'...म्हणून भारतापेक्षा आम्ही वरचढ', IND vs PAK सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

त्यानंतर तोहिदने एक बाजू सांभाळली होती. मात्र, तोही 97 चेंडूत 82 धावांवर बाद झाला, त्यानंतर खालची फळी मथिशा पाथिराना आणि महिश तिक्षणाने गुंडाळली. त्यामुळे बांगलादेशचा डाव संपला.

श्रीलंकेकडून कर्णधार दसून शनका, मथिशा पाथिराना आणि महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच दुनिथ वेलालागेने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाछी आमंत्रित केले होते. श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि दिमुथ करुणारत्ने यांनी सलामीला फलंदाजी केली. पण करुणारत्ने 18 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर पाथम निसंका आणि कुशल मेंडिस यांनी डाव पुढे नेत श्रीलंकेला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Sri Lanka
IND vs PAK: केएल राहुल की इशान किशन, भारताची डोकेदुखी वाढली; कशी असणार पाकिस्तानविरुद्ध 'प्लेइंग-11'

मात्र स्थिरावलेला निसंका 40 धावा करून बाद झाला. पाठोपाठ काही वेळातच अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कुशल मेंडिसही 50 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर सदिरा समरविक्रमाने श्रीलंकेच्या डावाची एक बाजू भक्कम पणे सांभाळत आक्रमक अर्धशतकही केले. मात्र त्याला भक्कम साथ मिळाली नाही.

तरी कर्णधार शनकाने चांगली साथ देण्याचा प्रयत्न केलेला. त्याने समरविक्रमाबरोबर अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र, तो 24 धावांवर बाद झाला. त्यानंतरही समरविक्रमा अखेरपर्यंत खेळत राहिला आणि त्याने श्रीलंकेला आडीचशेचा टप्पा पार करून दिला.

मात्र, डावाच्या शेवटच्या चेंडूवर समरविक्रमा बाद झाला. त्याने 72 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 93 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 257 धावा केल्या.

बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि हसन मेहमुद यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच शोरिफुल इस्लाम याने 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com