Goa: टोकियो ऑलिंपिक जागृती कार्यक्रमाचा मडगावात शुभारंभ

स्पर्धात्मक दर्जा वाढविण्याचे, स्वतःला तंदुरुस्त (Fitness) ठेवण्याचे सरदेसाई यांचे खेळाडुंना आवाहन (Goa)
In the presence of MLA Vijay Sardesai and others, a ribbon-cutting event for the Tokyo Olympic Awareness in Margao - Goa. on Friday, 23 July,2021.
In the presence of MLA Vijay Sardesai and others, a ribbon-cutting event for the Tokyo Olympic Awareness in Margao - Goa. on Friday, 23 July,2021.Manguesh Borkar / Dainik Gomantak

फातोर्डा: गोवा ऑलिंपिक असोसिएशनने (Goa Olympic Association) गोवा क्रिडा प्राधिकरणाच्या (Goa Sports Authority) सहकार्याने आयोजित केलेल्या टोकियो ऑलिंपिक जागृती (Tokyo Olympic Awareness) कार्यक्रमाचा शुभारंभ मडगाव नगरपालिकेच्या (Margao Municipality) आगाखान बागेत (Agakhan Garden) फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आला (MLA Vijay Sardesai). या जागृती कार्यक्रमाअंतर्गत ऑलिंपिक स्पर्धाचे (Tokyo Olympic) थेट प्रक्षेपणासह पुढील आठ ते दहा दिवसात वेगवेगळ्या क्रिडा प्रकारातील खेळाडूंचा, क्रिडा आयोजकांचा गौरव केला जाईल. आज सर्वप्रथम युवा ऍथलिटनी न्यु मार्केटमध्ये धावत फेरी मारली. जागतिक महायुद्धाच्या वेळी ऑलिंपिक स्पर्धा रद्द झाल्या होत्या. पण पुढे ढकलुन या खेळांचे आयोजन हे प्रथमच होत असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. गोव्यातुन एकही ऍथलिट ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याच्या दर्जाचा खेळा़डू तयार होत नसल्याबद्दल सरदेसाई यांनी खंत व्यक्त केली.

In the presence of MLA Vijay Sardesai and others, a ribbon-cutting event for the Tokyo Olympic Awareness in Margao - Goa. on Friday, 23 July,2021.
Tokyo Olympic: गोवा क्रीडा प्राधिकरणाची ऑलिंपिक स्पर्धा प्रश्नमंजुषा

क्रिडामंत्र्यांनी बॉक्सिंगसाठी गोव्यात काहीच केले नाही असे ऑलिंपिकात तांत्रिक अधिकारी म्हणून गेलेले बॉक्सिंग प्रशिक्षक लेनी द गामा यांनी जे म्हटले त्यावरुन गोव्यात क्रिडा क्षेत्राची प्रगती होत नाही हेच दिसुन येत आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.खेळाडुंनी स्पर्धात्मक दर्जा वाढविण्यासाठी व त्याचबरोबर स्वताला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन सरदेसाई यांनी केले. गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. सद्याच्या या करोनाच्या महामारीत प्रत्येकाने स्वताचे रक्षण करावे व संभवनीय तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे असेही सरदेसाई म्हणाले.

In the presence of MLA Vijay Sardesai and others, a ribbon-cutting event for the Tokyo Olympic Awareness in Margao - Goa. on Friday, 23 July,2021.
Tokyo Olympic: स्पर्धा अखेरच्या क्षणी रद्द होऊ शकतात- मुटो

या प्रसंगी त्यांनी मडगाव नगरपालिकेच्या बागेची दुरुस्ती करुन नवा साज चढविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा व नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऍंथोनी फर्नांडिस हे व्यासपिठावर उपस्थित होते. मनोहर बोरकर यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. जलतरण असोसिएशनचे सचिव सुदेश नागवेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व सायकलिंग असोसिएशनचे डॉ. नितीश केरकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजन गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे पदाधिकारी रुपेश महात्मे यांनी केले. या कार्यक्रमाअंतर्गत जिमनेस्टिक, फेन्सिंग, तायक्वोंडो, हॅंडबॉल, बिलियर्डस, ऍथलेटिक्स, जलतरण, टेबल टेनिस, हॉकी. आर्चरी, ज्युदो, बॅडमिंटन या क्रिडा प्रकारांतील खेळगड्यांचा, आयोजकांचा गौरव केला जाणार आहे. उद्या अभिजित प्रभु वेळगेकर, मंगेश दानी, मनोहर नायकोजी, लिंडन कार्दोज, अभिजीत ढेरे (जिमनेस्टिक), कुशल दास, बिप्रताप शर्मा, रोहन कांबळे, कृतिका नाईक, अखिता शिरोडकर (फेन्सिंग) यांचा गौरव केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com