Mapusa City Run: 14 ऑगस्टला 'म्हापसा सिटी रन 2.0' ; नोंदणी सुरू

Mapusa City Run 2.0
Mapusa City Run 2.0Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा (Mapusa) येथील श्रीधोरा काकुलो कॉलेज माजी विद्यार्थी संघटना व सारस्वत विद्यालय एज्युकेशन सोसायटीतर्फे 14 ऑगस्ट रोजी सकाळी 06 वाजता म्हापसा सीटी रन 2.0 चे (Mapusa City Run 2.0) आयोजन केल्याची माहिती या संस्थेचे चेअरमन रामनाथ बुर्वे यांनी दिली. म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. शर्मिला बोरकर, डॉ. जयेश च्युरी, साहिल नाईक, रिद्धी खोलकर, सुधानशीव, समन्वयक अनिकेत शण, भाग्यलक्ष्मी खेडेकर, दिव्या पटेल उपस्थित होते.

Mapusa City Run 2.0
CWG 2022: जेरेमी लालरिनुंगाने भारतासाठी जिंकले दुसरे सुवर्ण, वयाच्या 19 व्या वर्षी मोठा विक्रम

ऑगस्ट 2019 मध्ये या 'रन'चे पहिले आयोजन केले होते. मात्र, मध्यंतरी कोविडमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. आता 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) निमित्त या 'रन'चे आयोजन केल्याची माहिती बर्वे यांनी दिली. सर्व स्पर्धकांना पदक व प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे.

असे आहेत तिकीट दर

म्हापसा रनसाठी 30 जुलै दुपारी 02 वाजल्यापासून या रनसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. 03 किमी. रनला 350 रुपये तिकीट, 05 किमी. रखला 550 रुपये, 10 किमी. रनला 650 रुपये व विद्यार्थ्यांच्या 03 किलोमीटर रनला 100 रुपये तिकीट असणार आहे.

सकाळी 06 वाजता सारस्वत विद्यालयाच्या त्याला सुरुवात होणार आहे. शहराला वळसा घालत तिथेच त्याची समाप्ती होणार असल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

Mapusa City Run 2.0
पेडणेत युवक ठार; मालिका थांबेना!

75 हजार रूपयांचे बक्षिस

म्हापसा 'रन 2.0' एकूण पाच श्रेणीत असणार आहे. ज्यात 03 किमी. ओपन (पुरूष व महिला), 03 किमी. इयत्ता 5 वी ते 7 वी, 3 किमी. ज्येष्ठ नागरिक, 5 किमी. ओपन (पुरूष व महिला), 10 किमी. ओपन (पुरूष व महिला) यांचा समावेश असणार आहे. यातील प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन फिनिशर्सना रोख 75 हजार रुपये बक्षीस दिले जाणार असल्याचे समन्वयक अनिकेत शणै यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com