Madrid Spain Masters 2023: माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा सध्या स्पेनमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेत भारतीय शटलर्सनी चमकदार कामगिरी केली आहे.
भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने या विजयासह उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे, किदाम्बी श्रीकांतसाठी आजचा दिवस वाईट होता.
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने (PV Sindhu) शुक्रवारी माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
मात्र, किदाम्बी श्रीकांत स्पर्धेतून बाहेर पडला. सिंधूने 2023 मध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या 19व्या स्थानी असलेल्या मिया ब्लिचफेल्डचा 21-14, 21-17 असा पराभव करुन प्रथमच उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतला जपानच्या (Japan) अव्वल मानांकित केंटा निशिमोटोकडून 18-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.
दुस-या मानांकित सिंधूला लय शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला कारण, तिने दीर्घ दुखापतीनंतर पुनरागमन केले.
सिंधू दुसर्या गेममध्ये बहुतांश पिछाडीवर होती, परंतु तिने 6-12 अशी पिछाडीवरुन सरळ गेममध्ये विजय मिळवला.
सुपर 300 स्पर्धेतील एकमेव भारतीय खेळाडू सिंधूचा अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी सिंगापूरच्या बिगरमानांकित येओ जिया मिनशी सामना होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.