U-19 Cooch Behar Trophy: गोव्याचा चिवट प्रतिकार, मात्र मध्य प्रदेशची आघाडी कायम

रिजुल पाठकचे नाबाद अर्धशतक, यश, दीप यांचीही साथ
U-19 Cooch Behar Trophy
U-19 Cooch Behar TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात मध्य प्रदेशने 224 धावांची आघाडी घेत गोव्यावर फॉलोऑन लादला, त्यानंतर यजमान संघाने चिवट प्रतिकार केला. रिजुल पाठक याचे संयमी नाबाद अर्धशतक, तसेच त्याला यश व दीप या कसवणकर बंधूंची लाभलेली साथ यामुळे गोव्याला दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 6 बाद 186 धावा करता आल्या.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात गोव्याचा पहिला डाव कालच्या 7 बाद 137 वरून सोमवारी सकाळी 161 धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या डावातही गोव्याची 4 बाद 57 अशी घसरगुंडी उडाली तेव्हा सामना तिसऱ्याच दिवशी संपण्याची चिन्हे दिसू लागली. मात्र रिजुलने पाचव्या विकेटसाठी यश कसवणकर (34) याच्यासमवेत 63 धावांची भागीदारी करून संघाला शतकी धावसंख्या गाठून दिली.

U-19 Cooch Behar Trophy
I League Tournament: 'चर्चिल ब्रदर्स'ला नमवत 'रियल काश्मीर'ची विजयी दौड कायम

नंतर रिजुलने कर्णधार दीप कसवणकर (नाबाद 41) याच्यासह सातव्या विकेटसाठी 65 धावांची अभेद्य भागीदारी करून सामना चौथ्या दिवसापर्यंत लांबवला. रिजुल 52 धावांवर नाबाद असून त्याने 127 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार मारले. गोव्याचा संघ अजून 38 धावांनी मागे आहे. गोलंदाजीत मध्य प्रदेशतर्फे पहिल्या डावात अन्वेश चावला याने, तर दुसऱ्या डावात सौमीकुमार पांडे याने डावात 5 गडी बाद केले.

U-19 Cooch Behar Trophy
I League Tournament: 'चर्चिल ब्रदर्स'ला नमवत 'रियल काश्मीर'ची विजयी दौड कायम

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश, पहिला डाव : 385

गोवा, पहिला डाव (7 बाद 137 वरून) : 68 षटकांत सर्वबाद 161 (दर्पण पागी नाबाद 34, जीवनकुमार चित्तेम 16, पुंडलिक नाईक 0, फरदीन खान 10, माधव तिवारी 2-30, विनीतसिंग बघेल 2-28, अन्वेश चावला 5-45).

गोवा, दुसरा डाव : 70 षटकांत 6 बाद 186 (वीर यादव 11, देवनकुमार चित्तेम 24, आर्यन नार्वेकर 16, दर्पण पागी 0, यश कसवणकर 34, रिजुल पाठक नाबाद 52, सनथ नेवगी 0, दीप कसवणकर नाबाद 41, सौमीकुमार पांडे 5-60).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com