Mark Wood set to miss final stages of IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा आता रंगत चालली आहे. आयपीएलच्या या 16 व्या हंगामातील पहिला टप्पा आता संपला असून गुणतालिकेत प्रत्येक सामन्यानंतर बदल झालेले पाहायला मिळत आहेत. पण अशातच लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी चिंता वाढण्याची शक्यता आहे.
लखनऊ संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मार्क वूड या स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. वूड पुढील महिन्याच्या अखेरीस बाबा बनणार आहे. त्याचमुळे त्याच्या बाळाच्या जन्माच्या कारणाने तो आयपीएल 2023 च्या अखेरच्या टप्प्यात त्याच्या घरी जाणार असल्याचे समजत आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार वुड आणि त्याची पत्नी सारा मे महिन्याच्या अखेरीस दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या अपत्याच्या जन्मावेळी उपस्थित राहण्यासाठी वूड पुढील महिन्यात कधीही मायदेशी परतू शकतो. दरम्यान, तो त्याच्या बाळाच्या जन्मानंतर पुन्हा आयपीएल 2023 खेळण्यासाठी येण्याची शक्यता कमी आहे.
वूडने या हंगामात आत्तापर्यंत लखनऊसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 4 सामन्यात 11.81 च्या सरासरीने आणि 8.12 च्या इकोनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या आहेत. वूड गेल्या दोन सामन्यात बरे नसल्याने खेळलेला नाही. त्याला लखनऊने 2022 आयपीएल लिलावात 7.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफचे सामने 23 ते 28 मे दरम्यान खेळवले जाणार आहेत. 23 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना, 24 मे रोजी एलिमिनेटर आणि 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर चेन्नईमध्ये होणार आहे. तसेच दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना अहमदाबादला खेळवला जाईल.
लखनऊची आयपीएल 2023 मधील आत्तापर्यंत संमिश्र कामगिरी झाली आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमधील 4 सामने जिंकले असून 3 सामने पराभूत झाले आहेत. ते सध्या गुणतालिकेत हंगामातील 34 सामन्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.