Lucknow Super Giants vs Mumbai Indians Dream11 Team Prediction: आयपीएल 2023 चा दुसरा एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बुधवारी चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पराभूत संघाला दुसरी संधी मिळणार नाही. येथे पराभव म्हणजे स्पर्धेतून बाहेर पडणे. चेपॉक स्टेडियमवर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.
दरम्यान, या मोसमात दोन्ही संघांमध्ये केवळ एकच सामना खेळला गेला. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना झाला. त्या रोमहर्षक सामन्यात यजमानांनी पाच धावांनी सामना जिंकला. यावेळी खेळपट्टीची परिस्थितीही वेगळी आहे, अशा परिस्थितीत संघ विचार करुनच प्लेइंग इलेव्हनची निवड करतील.
मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) चेन्नईच्या खेळपट्टीनुसार तसेच लखनऊ सुपर जायंट्सच्या संघानुसार प्लेइंग इलेव्हनची निवड करावी लागेल. लखनऊच्या संघात अनेक डावखुरे फलंदाज आहेत, अशा परिस्थितीत मुंबई हृतिक शोकीनला संधी देऊ शकते.
तिलक वर्माला गेल्या सामन्यात इपॅक्ट प्लेयर म्हणून संधी देण्यात आली होती. यावेळी, मुंबई इंडियन्स आपल्या या मॅचविनर फलंदाजाचा प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकते. असे झाल्यास विष्णू विनोदला बाहेर जावे लागेल.
केएल राहुलला (KL Rahul) संघातून बाहेर पडल्यापासून सलामीची जोडी लखनऊ सुपरजायंट्स संघासाठी अडचणीची ठरली आहे. क्विंटन डिकॉकसाठी संघाला चांगल्या जोडीदाराची गरज आहे.
अशा स्थितीत काईल मायर्सला संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत नवीन-उल-हकला बाहेर जावे लागेल. चेन्नईची खेळपट्टी पाहता अमित मिश्राला इपॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवले जाऊ शकते.
लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - काईल मेयर्स, क्विंटन डी कॉक, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, निकोलस पूरन, आयुष बडोनी, के गौतम, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा/विष्णू विनोद, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, आकाश मधवाल, रितिक शोकीन.
कीपर्स- क्विंटन डिकॉक, ईशान किशन
फलंदाज- निकोलस पूरन, टिम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,
गोलंदाज- पियुष चावला, मोहसीन खान, रवी बिश्नोई
अष्टपैलू- मार्कस स्टॉइनिस, कॅमेरुन ग्रीन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.