Basketball tournament: लुर्डस बास्केटबॉल क्लबने मारली बाजी

महिला गटात वायएमसीए संघाची सरशी
 state level basketball tournament
state level basketball tournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा बास्केटबॉल संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत लुर्डस बास्केटबॉल क्लबने केजेस संघावर 19 गुणफरकाने मात करून विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धा पणजीतील डॉन बॉस्को इनडोअर बास्केटबॉल स्टेडियममध्ये झाली. महिला गटात वायएमसीए संघाने बाजी मारली.

(Lourdes Basketball Club won the state level basketball tournament in Panaji)

 state level basketball tournament
Asia Cup 2022 साठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, मोहम्मद नबी करणार नेतृत्व

अंतिम लढतीत विजेत्या लुर्डस संघाच्या जेसन नॅथन याने 18, जोशुआ पिंटो याने 15, तर बाविश बिजॉय याने 14 गुणांची नोंद केली. कर्णधार जेशुआ पिंटो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. पराभूत केजेस संघातर्फे खिंड लढविताना हिमांशू सिंग याने 24, शिवकुमार उंडगोटी याने 10 गुण नोंदविले.

 state level basketball tournament
Goa Police Cup : पोलिस कप स्पर्धेत गतविजेत्यांची अनुपस्थिती

महिला गटात वायएमसीए व सोनिक्स यांच्यातील सामना अटीतटीचा ठरला. सामन्यातील वीस सेकंद बाकी असताना दोन्ही संघ गुणबरोबरीत होते, मात्र अखेरीस वायएमसीए महिलांनी वर्चस्व मिळवत विजेतेपद पटकाविले. सामन्यात दहा गुण नोंदविलेल्या सारा हुसेन हिचे अंतिम क्षणातील बास्केट सामन्यात निर्णायक ठरले. 18 गुण नोंदविलेली अमिशा बोरकर सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली. सोनिक्सच्या शिमेई नॅथन हिने 12 गुण संघाच्या खात्यात जमा केले.

Goa Sports: साखळीच्या करणची विजयी झेप

राज्यस्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत साखळीच्या करण धावसकर याने संस्मरणीय कामगिरी नोंदविताना पुरुष एकेरीत विजेतेपद पटकावले. त्याने तीन गेममधील चुरशीच्या लढतीत उमाकांत सर्गे याच्यावर 21-13, 22-24, 21-19 असा रोमहर्षक विजय नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com