Lionel Messi: इंटर मियामीसाठी पहिली ट्रॉफी जिंकणाऱ्या मेस्सीचा व्हिडिओ वायरल; माजी कर्णधारासाठी...

Inter Miami: विशेष म्हणजे इंग्लंडचा माजी दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम अमेरिकेतल इंटर मियामी फुटबॉल क्लबचा मालक आहे.
Lionel Messi Won First Trophy For Inter Miami In Leagues Cup 2023.
Lionel Messi Won First Trophy For Inter Miami In Leagues Cup 2023.Dainik Gomantak
Published on
Updated on

Lionel Messi Won First Trophy For Inter Miami In Leagues Cup 2023:

जगातील अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या, अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने अमेरिकेतही आपली जादू कामय ठेवली आहे. त्याने अमेरिकन क्लब इंटर मियामीला पहिल्यांदा लीग कपमध्ये चॅम्पियन बनवले.

मेस्सीच्या नेतृत्वाखाली संघाने सलग सातवा सामना जिंकला. लीग कपच्या अंतिम फेरीत नॅशव्हिलचा पराभव केला. निर्धारित वेळेनंतर सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. तेथे इंटर मियामीने 10-9 अशा फरकाना सामना जिंकला.

विशेष म्हणजे इंग्लंडचा माजी दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम इंटर मियामी क्लबचा मालक आहे.

यावेळी मेस्सीने इंटर मियामीसाठी सात सामन्यांमध्ये दहावा गोल केला. पूर्वार्धातच त्याने संघाला आघाडी मिळवून दिली. मेस्सीने 23व्या मिनिटाला बॉक्सच्या बाहेरून थेट गोल केला आणि प्रतिस्परर्ध्यांना चकित केले.

उत्तरार्धात नॅशव्हिल संघाने पुनरागमन करत 57व्या मिनिटाला फाफा पिकोल्टने केलेल्या गोलने सामना बरोबरीत आणला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांना दुसरा गोल करता आला नाही.

Lionel Messi Won First Trophy For Inter Miami In Leagues Cup 2023.
Prithvi Shaw Post: 'आयुष्यात पुढे पाऊल टाकता, तेव्हा...', वनडे कपमधून बाहेर झाल्यानंतर शॉची पोस्ट चर्चेत

संघाच्या माजी कर्णधाराचा सन्मान

लिओनेल मेस्सी नुकताच इंटर मियामीमध्ये सामील झाला आहे. संघात येताच मेस्सीला नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.

जेव्हा इंटर मियामीने लीग कप जिंकला तेव्हा मेस्सीने प्रथम संघाचा माजी कर्णधार डिआंद्रे येडलिनला आर्म बँड दिला. यानंतर मेस्सीने पुन्हा त्याच्याकडून ट्रॉफी घेतली. त्यानंतर येडलिनने ट्रॉफी उंचावली आणि मेस्सीसोबत सेलिब्रेशन केले. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कृत्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

Lionel Messi Won First Trophy For Inter Miami In Leagues Cup 2023.
Archery World Cup Stage 4: भारतीय तिरंदाज पॅरिसमध्ये चमकले! कपांउंडमध्ये महिला-पुरुष संघांना 'गोल्ड मेडल'

मेस्सीच्या कारकिर्दीतील 44 वे विजेतेपद

मेस्सीने आपल्या फुटबॉल कारकिर्दीतील 44 वे विजेतेपद पटकावले. तो सर्वाधिक विजेतेपद मिळवणारा फुटबॉल खेळाडू बनला आहे. यामध्ये त्याने त्याचा बार्सिलोनाचा माजी सहकारी डॅनी अल्वेसला मागे टाकले.

ब्राझीलच्या अल्वेसने कारकिर्दीत 43 विजेतेपदे जिंकली. सध्या तो वादात सापडला असून बलात्काराच्या एका प्रकरणात तुरुंगात आहे.

मेस्सीबद्दल बोलायचे झाले तर त्याने स्पॅनिश क्लब बार्सिलोनासोबत ३५, अर्जेंटिनासाठी पाच, फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेनसाठी तीन आणि अमेरिकन क्लब इंटर मियामीसाठी एक ट्रॉफी जिंकली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com