Lionel Messi: लिओनेल मेस्सीची जादू! इंटर मियामीसाठी दोन गोल नोंदवत मिळवून दिला मोठा विजय

Lionel Messi: स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिला. मेस्सीने लीग कपमध्ये अटलांटा युनायटेडविरुद्ध दोन गोल नोंदवत इंटर मियामीला जिंकून दिले.
Lionel Messi
Lionel MessiDainik Gomanak

Lionel Messi: स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिला. मेस्सीने लीग कपमध्ये अटलांटा युनायटेडविरुद्ध दोन गोल नोंदवत इंटर मियामीला जिंकून दिले. इंटर मियामीने येथे अटलांटा युनायटेडचा 4-0 असा पराभव करुन लीग कपमधील सलग दुसरा विजय नोंदवला.

दरम्यान, मेस्सीने मियामीसाठी शानदार दोन गोल नोंदवले. यजमानांनी आठव्या मिनिटाला आघाडी घेतली जेव्हा मेस्सीने सर्जिओ बुस्केट्सच्या उंच पासवर धाव घेतली आणि रिबाऊंडवर गोल डागला. दुसऱ्या क्षणात मेस्सीने पुन्हा आपला जलवा दाखवून दिला.

सामन्याच्या 22व्या मिनिटाला मेस्सीने संघासाठी दुसरा गोल नोंदवला. तर टेलरने इंटर मियामीसाठी तिसरा गोल केला. त्याने 44 व्या मिनिटाला गोल करुन संघाला हाफ टाईमपर्यंत 3-0 ने आघाडी मिळवून दिली. टेलरने 53व्या मिनिटाला दुसरा गोल करुन 4-0 अशी आघाडी घेतली.

Lionel Messi
Lionel Messi Birthday: स्वप्नवत कारकिर्द घडवणाऱ्या मेस्सीच्या आयुष्यातील 5 सुवर्णक्षण एकदा पाहाच

दुसरीकडे, या विजयासह इंटर मियामीने बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. संघ 32 व्या फेरीत पोहोचला आहे. त्याचा ग्रुप-जे मधील हा सलग दुसरा विजय आहे.

इंटर मियामीचे दोन सामन्यांत सहा गुण आहेत. या गटात क्रुझ अझुल दुसऱ्या तर अटलांटा युनायटेड तिसऱ्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com