Lionel Messi In India: मेस्सी आला अन् मैदानात तूफान राडा, चाहत्यांनी पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या फेकल्या, टेंट उखडले, काहीजण जखमी Watch Video

Lionel Messi India Visit Video: लिओनेल मेस्सी त्याच्या तीन दिवसांच्या GOAT इंडिया टूरसाठी भारतात आहे. त्याचा पहिला मुक्काम कोलकाता होता, जिथे तो १३ डिसेंबर रोजी पहाटे ३:०० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरला.
Lionel Messi in India
Lionel Messi in IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Lionel Messi Salt Lake Stadium Video

पश्चिम बंगाल: लिओनेल मेस्सी त्याच्या तीन दिवसांच्या GOAT इंडिया टूरसाठी भारतात आहे. त्याचा पहिला मुक्काम कोलकाता होता, जिथे तो १३ डिसेंबर रोजी पहाटे ३:०० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरला.

मेस्सी येताच चाहते विमानतळावर त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. चाहते खूप आनंदी झाले आणि त्यांनी "मेस्सी, मेस्सी!" असा जयघोष केला. त्यानंतर मेस्सी हॉटेलकडे निघाला. तिथून तो साल्ट लेक स्टेडियममध्ये जाणार होता, जिथे तो अनेक प्रमुख व्यक्तींना भेटणार होता. लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल देखील मेस्सीसोबत त्याच्या भारत दौऱ्यात आहेत.

लिओनेल मेस्सी मैदानातून लवकर निघून गेला

लिओनेल मेस्सीने कोलकात्याच्या लेक सिटीमध्ये त्याच्या ७० फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. नंतर, तो बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि RPGS ग्रुपचे मालक संजीव गोयंका यांना भेटला. त्यानंतर तो कोलकात्याच्या साल्ट लेक स्टेडियममध्ये गेला, जिथे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आधीच उत्सुक होते. मात्र मेस्सी लगेच मैदानातून निघून गेला.

स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सर्व चाहते प्रचंड संतापले. अनेक चाहते मैदानाच्या मध्यभागी पोहोचले आणि मैदानात एक विचित्र गोंधळ उडाला. नंतर, चाहत्यांनी स्टेडियमच्या खुर्च्या उखडल्या आणि मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत. मेस्सी लवकर गेला कारणामुळे चाहते संतापले होते.

लिओनेल मेस्सीच्या एका चाहत्याने म्हटले, "अगदी निराशाजनक. तो फक्त १० मिनिटांसाठी आला होता. सर्व राजकारणी आणि मंत्री त्याला घेरले होते. आम्हाला काहीही दिसले नाही. त्यांनी शाहरुख खानलाही आणणार असल्याचे सांगितले होते, पण त्यांनी कोणालाही आणले नाही. तो १० मिनिटांसाठी आला आणि निघून गेला. खूप पैसे, भावना आणि वेळ वाया गेला. आम्हाला काहीही दिसले नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com