France: जेव्हा राष्ट्राध्यक्षच करतात फ्रान्सच्या खेळाडूंचे सांत्वन, पाहा भावनिक करणारे व्हिडिओ

फ्रान्सला फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी खेळाडूंचे सांत्वन केले.
French President Emmanuel Macron consoled French Players
French President Emmanuel Macron consoled French Players Dainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सवर पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने विजय मिळवला आणि विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले.

त्यामुळे एकीकडे अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तर दुसरीकडे फ्रान्सच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट जाणवत होती. याचदरम्यान फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या एका कृतीची खूप चर्चा होत आहे.

मॅक्रॉन रविवारी लुसैल स्टेडियमवर अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यातील अंतिम सामना पाहाण्यासाठी उपस्थितीत होते. त्यांनी या संपूर्ण अंतिम सामन्याचा आनंद घेतला. मात्र, अखेरपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात फ्रान्सला पराभवाचा धक्का बसला. यानंतर मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या खेळाडूंचे सांत्वन केले.

या सामन्यात फ्रान्सकडून 23 वर्षीय कायलिन एमबाप्पेने गोलची हॅट्रिक साजरी केली होती. त्याने फ्रान्सला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. पेनल्टी शुटआऊटमध्येही त्याने फ्रान्ससाठी पहिला गोल केला होता. मात्र, गतविजेत्या फ्रान्सला विजेतेपद राखण्यात अपयश आले. एमबाप्पेने या संपूर्ण विश्वचषकात 8 गोल करत गोल्डन बूटही जिंकला.

मात्र, विश्वविजेतेपद राखण्यात अपयश आल्याने तो निराश झाला होता. त्यावेळी मॅक्रॉन यांनी त्याच्या जवळ येत त्याची समजूतही काढली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

तसेच मॅक्रॉन यांनी ड्रेसिंग रुममध्येही फ्रान्सच्या संघाला प्रोस्ताहन दिले. याचा व्हिडिओही मॅक्रॉन यांच्या ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच त्यांनी ट्वीट केले आहे की 'या विश्वचषकात फ्रान्स संघाच्या कामगिरीबद्दल आणि त्यांच्या लढाईबद्दल अभिनंदन. तुम्ही देशातील आणि जगभरातील चाहत्यांना रोमांचित केले. अर्जेंटिनाला त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन.'

या सामन्यात फ्रान्सकडून एमबाप्पेने शानदार खेळ दाखवला होता. त्याने दुसऱ्या हाफमध्ये लागोपाठ दोन गोल केले होते, तर ज्यादा वेळेत एक गोल करत फ्रान्सला अर्जेंटिनाशी 3-3 ची बरोबरी साधून दिलेली. मात्र, पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्सकडून त्याला आणि कॉलो मुआनी यांनाच गोल करता आले. त्यामुळे फ्रान्सला पराभवाचा सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com