WPL Auction 2023: बीसीसीआयची पहिली महिला लिलावकर्ता! कोण आहे मलिका सागर?

पहिल्या WPL लिलावात मलिका अडवानी सागर यांनी लिलावकर्त्याची भूमिका निभावली.
Mallika Sagar
Mallika SagarDainik Gomantak

WPL Auction 2023: सोमवारी (13 फेब्रुवारी) वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामाचा लिलाव मुंबईत पार पडला. या लिलावात अनेक स्टार खेळाडूंच्या बोलींनी चकीत केले. भारतीय खेळाडूंबरोबरच परदेशी खेळाडूंनाही या लिलावात मोठ्या बोली लागल्या. पण हा लिलाव घेणारी महिला लिलावकर्ता नक्की कोण असा अनेकांना प्रश्न पडला होता.

पहिल्या डब्ल्यूपीएल लिलावातील लिलावकर्त्याची भूमिका मलिका अडवानी सागर यांनी निभावली. मलिका सागर या मुंबईस्थित आर्ट कलेक्टर आणि सल्लागार असून आर्ट इंडिया कन्सल्टंट फर्ममध्ये भागीदारही आहेत.

Mallika Sagar
WPL 2023 Auction: स्मृती मानधनाला लागली 3 कोटींहून अधिकची बोली, 'या' संघात झाली सामील

मलिका सागर यांची एखाद्या क्रीडा स्पर्धेचा लिलाव घेण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. त्यांनी यापूर्वी प्रो कबड्डी 2021 लिलावातही काम केले होते. तसेच यापूर्वी त्यांनी अनेक आर्ट गॅलरीमध्ये लिलावकर्ता म्हणून काम केले आहे. त्यांनी 2001 मध्ये पहिल्यांदा क्रिस्टीज या ब्रिटीश ऑक्शन हाऊसमध्ये लिलावकर्ता म्हणून काम पाहिले होते.

दरम्यान, बीसीसीआयने पहिल्यांदाच लिलावकर्ता म्हणून महिलेची निवड केली आहे. यापूर्वी आयपीएल लिलावात ह्यू एडमीड्स, रिचर्ड मॅडले आणि चारू शर्मा यांनी लिलावकर्ता म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे मलिका सागर बीसीसीआयच्या पहिल्याच महिला लिलावकर्ता ठरल्या.

मलिका सागर यांनी डब्ल्यूपीएल लिलावाची तयारी जुन्या आयपीएल लिलावांचे व्हिडिओ पाहून केली असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी सांगितले की 'डब्ल्यूपीएलचा लिलाव घेणे माझ्यासाठी सन्मानाचे आणि अभिमानाचे आहे.'

Mallika Sagar
WPL Auction 2023: जल्लोष तर होणारच! कोट्यवधींची बोली लागल्यानंतर मानधना, हरमनप्रीतचा टीम इंडियासह 'कल्ला'

डब्ल्यूपीएलचा लिलाव मुंबईतील जियो वर्ल्ड कॉनवेन्शन सेंटरमध्ये पार पडला. या लिलावासाठी 448 खेळाडूंचा समावेश होता. यंदाच्या डब्ल्यूपीएलसाठी 5 संघांत मिळून 90 खेळाडूंची जागा होती. तसेच प्रत्येक संघाला या लिलावातून 15 ते 17 खेळाडू घेण्याची परवानगी होती, तसेच यासाठी त्यांना 12 कोटी रुपये खर्च करता येणार होते.

डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम 4 ते 26 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. या हंगामात 22 सामने खेळवण्यात येणार असून हे सामने मुंबईतील ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील या दोन स्टेडियमवर होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com