Team India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जूनमध्ये होणार आहे. तत्पूर्वीच, आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून टीम इंडियाचा एक स्टार फलंदाज बाहेर पडला आहे.
आधीच टीम इंडिया अनेक जखमी खेळाडूंच्या समस्येशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत या बातमीने संघाचा तणाव वाढला आहे.
चालू आयपीएल हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी, हा खेळाडू आधीच दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला होता.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलबाबत (KL Rahul) मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या चालू हंगामातून तो पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर आता आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही तो बाहेर पडला आहे.
ही माहिती त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. आपला फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, 'वैद्यकीय पथकाशी बोलल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दुखापतीमुळे लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
माझे पूर्ण लक्ष लवकरात लवकर मैदानात परतण्यावर असेल. मला माहित आहे की, हा निर्णय घेणे खूप कठीण आहे, परंतु या क्षणी तो माझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.'
राहुल सध्याच्या आयपीएल (IPL) मोसमात लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत होता. याबाबत त्याने लिहिले की, 'संघाचा कर्णधार असल्याने मला खूप वाईट वाटत आहे.
अशा महत्त्वाच्या काळात मी संघासोबत नाही, पण मला खात्री आहे की, संघाचे सर्व खेळाडू मैदानावर आपले 100 टक्के योगदान देतील. मी संघाला चिअर करत राहीन आणि प्रत्येक सामना पाहत राहीन.'
तो पुढे म्हणाला की, 'मी सर्वांचे आभार मानू इच्छितो - चाहत्यांनी, ज्यांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केले, लखनऊ सुपर जायंट्स संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयचे देखील आभार. माझ्या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सहकारी खेळाडूंच्या पाठिंब्याने भारावून गेलो.'
आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबाबत त्याने लिहिले की, 'पुढच्या महिन्यात ओव्हलवर होणाऱ्या या मोठ्या सामन्यात टीम इंडियाचा भाग नसल्यामुळे मी खूप निराश आहे. शक्य तितक्या लवकर मैदानात परतण्याचा माझा प्रयत्न असेल. याकडे माझे नेहमीच लक्ष राहिले आहे.'
त्याने पुढे लिहिले की, 'मी सर्वांना वचन देतो की मी तुम्हाला माझ्या पुनर्प्राप्तीबद्दल माहिती देत राहीन आणि शक्य तितक्या लवकर मैदानात परतेन.
गेले काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. दुखापती कधीच सोप्या नसतात, पण मी नेहमीप्रमाणे तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.