पणजी: गोवा विद्यापीठाच्या (Goa University )आंतरमहाविद्यालयीन पुरुष ज्युदो स्पर्धेत खांडोळा सरकारी महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद पटकाविले. ताळगाव पठारावरील विद्यापीठाच्या ज्युबिली हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेत फर्मागुढी येथील पीईएस आरएसएन महाविद्यालय व मिरामरा येथील व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयास संयुक्त उपविजेतेपद मिळाले.
( Khandola College won Goa University Inter-College Men's Judo Tournament)
स्पर्धेत राज्यभरातील महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. स्पर्धा एकूण आठ वजनगटात झाली व त्यात 88 खेळाडूंनी भाग घेतला. नावेली येथील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक डॉ. फ्रान्सिस लोबो, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे ज्युदो प्रशिक्षक मीर डायस यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
निकाल: 56 किलो वजनगट :संगप्पा गौडर (सीईएस-कुंकळ्ळी), देवराज लमाणी (रोझरी-नावेली), अखिलेश कुशवाह व महेश चांदरगी (दोघे डीएम्स-आसगाव), 60 किलो वजनगट :दर्शन नाईक (पीईएस-फर्मागुढी), ब्लेज डिसोझा (खांडोळा), ॲस्बन कार्दोझ (रोझरी-नावेली) व आदित्य साहानी (एसएस धेंपो-कुजिरा), 66 किलो वजनगट: निखिल परिट (पीईएस-फर्मागुढी), अर्जुन सोनुर्लेकर (डीएम्स-आसगाव)
हर्ष झोरे (गोवा मल्टिफॅकल्टी) व सोहन नाईक (सेंट झेवियर्स-म्हापसा), 73 किलो वजनगट: मयूर माईणीकर (खांडोळा), सौरभ गोवेकर (पदव्युत्तर-गोवा विद्यापीठ), एरिक्सन फिगरेदो (रोझरी-नावेली) व एलिप प्रवीण (खांडोळा), 81 किलो वजनगट: ध्रुव कुमार (व्ही. एम. साळगावकर कायदा-मिरामार), नामदेव गावडे (साखळी), अनुज भारद्वाज (श्रीदोरा काकुलो-म्हापसा) व विनायक शर्मा (पीईएस-फर्मागुढी).
90 किलो वजनगट: सुयश शिर्के (खांडोळा), साईश कोलवाळकर (डीएम्स-म्हापसा), अविनाश साळगावकर (व्ही. एम. साळगावकर कायदा-मिरामार) व ब्राहॅम रॉड्रिग्ज (रोझरी-नावेली), 100 किलो वजनगट: आकाश माडोळकर (जी. आर. कारे कायदा-मडगाव), खुदबुदीन कळ्ळोली (रोझरी-नावेली), संजित डायस (धेंपे-मिरामार) व साहिल खानविलकर (श्री दामोदर-मडगाव), 100 वरील किलोगट: अद्वैत कुमार (व्ही. एम. साळगावकर कायदा-मिरामार), वरुण कळंगुटकर (खांडोळा), यश्वनी च्यारी (खांडोळा) व अभिषेक परब (श्रीदारो काकुलो-म्हापसा).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.