Virat, Rohit चे दक्षिणेत 'माईंडच ब्लोईंग' स्वागत; दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेसाठी टिम सज्ज

भारताने दक्षिण आफ्रिकेला बायलॅटरल मालिकेत पराभूत केलेले नाही.
Virat, Rohit
Virat, RohitDainik gomantak
Published on
Updated on

ऑस्ट्रेलिया विरोधात मालिका विजय मिळवेल्या भारतीय संघाची बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होणार आहे. भारत आणि द. आफ्रिकेविरुद्धचा (Ind Vs SA) पहिला सामना केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघ तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाला आहे. भारत आणि द. आफ्रिका यांच्यात तीन T20I सामने होणार आहेत. विराट सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. आशिया चषक आणि ऑस्ट्रेलिया विरोधात मालिकेत विराटने (Virat Kohli) धडाकेबाज कामगिरी करत आपण परत आल्याचे संकेत क्रिकेटविश्वाला दिले. दरम्यान, दक्षिणेत विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांचे स्वागत अगदी वेगळ्या पद्धतीने करण्यात आले.

Virat, Rohit
IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती, या खेळाडूला मिळाली संधी

ऑल केरळ विराट कोहली फॅन असोसिएशन (AKVKFA) या फॅन ग्रुपने ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे विशाल फ्लेक्स उभारले आहेत. कोहली आणि रोहितचे चाहते जगभरात आहेत, पण त्यांच्याबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्याचा हा 'माईंडच ब्लोईंग' मार्ग दक्षिणेतील चाहत्यांनी शोधून काढला आहे. सोशल मीडियावर सध्या या फ्लेक्सची जोरदार चर्चा असून, त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला या मालिकांचा फायदा होणार असून, संघाच्या अनेक पैलूंवर काम करता येईल. डेथ ओव्हर्समध्ये आपल्या गोलंदाजीत सुधारणेसाठी संघाला वाव आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करता येईल. भारताने दक्षिण आफ्रिकेला बायलॅटरल मालिकेत पराभूत केलेले नाही. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमध्येही हे दोन्ही संघ आमनेसामने असतील. त्यापूर्वी ही मालिका महत्वाची मानली जात आहे.

Virat, Rohit
Women's Asia Cup 2022: महिला आशिया चषकाला 1 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात

असे आहेत दोन्ही संघाचे प्लेईंग ईलेव्हन

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण अफ्रीका : तेंबा बावुमा (कप्तान), क्विंटन डिकॉक, ब्योर्न फोर्चून, रीजा हेंडरिक्स, हेनरिच क्लासेन, मार्को जानसेन, केशव महारात, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एंगिडि, एनरिच नोर्किया, वेन परनेल, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कैगिसो रबाडा, रिली रोसोयू, तबरेज शम्सी, ट्रिस्टान स्टब्स.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com