IPL Auction 2022: लिलावात 'या' सुंदर चेहऱ्यांचा दबदबा, फोटो होतायेत व्हायरल

सोशल मीडियावरही (Social media) या तीन मुलींची खूप चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत लिलावात चर्चेत असलेले या तिघी कोण आहेत ते जाणून घेऊया.
Kavya Maran & Suhana Khan & Janhvi Mehta
Kavya Maran & Suhana Khan & Janhvi MehtaDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल 2022 चा लिलाव शनिवारी बंगळुरमध्ये सुरु झाला आहे. सर्व फ्रँचायझींनी आपापल्या रणनीतीनुसार खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करण्यास सुरुवात केली आहे. लिलावादरम्यान बोली लावणाऱ्यांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे, जे त्यांच्या फ्रँचायझींच्या वतीने खेळाडूंसाठी निर्णय घेत आहेत. सोशल मीडियावरही (Social media) या तीन मुलींची खूप चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत लिलावात चर्चेत असलेले या तिघी कोण आहेत ते जाणून घेऊया. (Kavya Maran Suhana Khan and Janhvi Mehta have participated in the IPL Auction 2022 auction)

काव्या मारन (Kavya Maran)

आयपीएल लिलावादरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) वतीने बसलेली मुलगी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. लिलावात हैदराबादसाठी बोली लावणाऱ्या या सुंदर मुलीचे नाव काव्या मारन आहे. काव्या ही सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. सनरायझर्स हैदराबाद टीमला सपोर्ट करताना ती दिसत आहे.

Kavya Maran & Suhana Khan & Janhvi Mehta
IPL 2022 Auction: शाकिब अल हसनने इतिहास रचून फ्रँचायझींना केलं आकर्षित

सुहाना खान (Suhana Khan)

बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि तिचा भाऊ आर्यन खान (Aryan Khan) खेळाडूंसाठी बोली लावत होते. 21 वर्षीय सुहाना पहिल्यांदाच लिलावात पोहोचली आहे, तर तिचा भाऊ आर्यन यापूर्वीही लिलावात दरम्यान दिसला होता. सुहाना प्री-ऑक्शनमध्येही दिसली होती.

जान्हवी मेहता (Janhvi Mehta)

बॉलिवूड अभिनेत्री आणि कोलकाता नाईट रायडर्सची सहमालक जुही चावलाची (Juhi Chawla) मुलगी जान्हवी मेहता (Janhvi Mehta) चार वर्षांनंतर पुन्हा एकदा लिलावात उतरली आहे. यापूर्वी ती इथे पोहोचली तेव्हा ती 18 वर्षाची होती. जान्हवी सुहानासह केकेआरच्या वतीने खेळाडूंची निवड करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com