Bishan Singh Bedi | Kapil Dev
Bishan Singh Bedi | Kapil DevICC /ANI

Bishan Singh Bedi: 'माझे कर्णधार, मार्गदर्शक अन् सर्वकाही...', बिशन सिंग बेदींच्या निधनानंतर कपिल देव भावूक

Bishan Singh Bedi: भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे सोमवारी निधन झाले, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थित होते.
Published on

Kapil Dev paid his homage to Bishan Singh Bedi :

भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे सोमवारी (23 ऑक्टोबर) निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त होत आहे. अनेक आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, भारताचे माजी विश्वविजेते कपिल देव हे देखील त्यांच्याबद्दल बोलताना भावुक झाले होते.

कपिल देव बेदी यांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना कपिल देव यांनी माजी दिग्गज फिरकीपटू बेदी यांना एक उत्तम व्यक्ती म्हणूनही संबोधले.

Bishan Singh Bedi | Kapil Dev
Kapil Dev Viral Video: कपिल देव यांचे अपहरण? गौतम गंभीरने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ

कपिल देव म्हणाले, 'आम्ही सर्वांनी क्रिकेट खेळले आणि आपल्या प्रत्येकालाच एक दिवस जावे लागणार आहे. पण खूप कमी लोक त्यांच्या स्वभावामुळे लक्षात राहातात, ज्यांचे व्यक्तिमत्व यशस्वी ठरते. भारतीय क्रिकेटसाठी हे मोठे नुकसान आहे. ते बाकी कशाहीपेक्षा चांगले व्यक्ती होते. ते माझे कर्णधार होते, माझे मार्गदर्शक होते, माझे सर्वकाही होते.'

कपिल देव यांच्याशिवाय विरेंद्र सेहवाग, झहीर खान, आशिष नेहरा, मोहम्मद अझरुद्दीन असे अनेक भारतीय क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.

सरदार ऑफ स्पिन

सरदार ऑफ स्पिन म्हणून ओळखल्या गेलेल्या बिशन सिंग बेदी यांनी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 67 कसोटी सामने खेळले होते. तसेच 10 वनडे सामने खेळले.

Bishan Singh Bedi | Kapil Dev
Bishan Singh Bedi: 'सरदार ऑफ स्पिन' बिशन सिंग बेदी यांची कशी होती कारकिर्द? पाहा आकडेवारी

त्यांनी कसोटीमध्ये 266 विकेट्स घेतल्या. त्यांनी कसोटीत 14 वेळा एका डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली, तर एक वेळा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. त्यांनी वनडेत 7 विकेट्स घेतल्या. त्यांनी 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले.

बेदी 70 आणि 80 च्या दशकात क्रिकेटविश्व गाजवलेल्या भारताच्या फिरकी चौकटीचा भाग होते. त्यांनी इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर या फिरकीपटूंसह क्रिकेटचे मैदान गाजवले.

बेदी यांनी त्यांच्या कारकिर्दीत 370 प्रथम श्रेणी सामने खेळताना 1560 विकेट्स घेतल्या. तसेच 7 अर्धशतकांसह 3584 धावाही केल्या. ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज आहेत. आजही हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com