Kapil Dev: 'पैसे आले की अहंकारही...', सध्याच्या भारतीय क्रिकेटर्सवर बरसले कपिल देव

Kapil Dev: कपिल देव यांनी सध्याच्या भारतीय खेळाडूंना अहंकारी म्हणत टीका केली आहे.
Team India | Kapil Dev
Team India | Kapil DevDainik Gomantak
Published on
Updated on

Kapil Dev criticized Current Indian Cricketers: भारतीय क्रिकेटने गेल्या 90 वर्षात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. पूर्वीच्या अर्थिक अडचणींवरही मात करत आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून ओळखले जाते. पण आता खेळाडूंना पैशामुळे अहंकार असल्याची तक्रार भारताची माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंवर सडकून टीका केली आहे.

कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंचे त्यांच्या आत्मविश्वासासाठी कौतुक केले, पण त्यांना अंहकार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी द विकशी बोलताना म्हटले की 'मदभेद तर सर्वांमध्ये असतात. पण या भारतीय खेळाडूंबाबत एक गोष्ट चांगल आहे की त्यांच्यात खूप आत्मविश्वास भरलेला आहे. पण वाईट गोष्ट ही देखील आहे की त्यांना वाटते त्यांना सर्व माहित आहे.'

Team India | Kapil Dev
Ravindra Jadeja: जड्डूचा नवा विक्रम! कपिल देव नंतर 'असा' डबल धमाका करणारा दुसराच भारतीय ऑलराऊंडर

1983 साली वनडे वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव म्हणाले, 'मला माहित नाही की चांगल्या प्रकारे कसे समोर ठेवायचे, पण ते आत्मविश्वासने भरलेले आहे, मात्र त्यांना वाटते की तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज नाही. पण माझे असे मत आहे की एक अनुभवी व्यक्ती नेहमीच तुमची मदत करू शकतो.'

'कधीकधी खूप पैसे येतात, तेव्हा त्याबरोबर अहंकारही येतो. या क्रिकेटपटूंना वाटते की त्यांना सर्वकाही माहित आहे. हाच फरक आहे. मी असे म्हणेल की अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे.'

Team India | Kapil Dev
Kapil Dev Love Story: सारिकाबरोबर ब्रेकअप ते रोमीला फिल्मी स्टाईल प्रपोजल; कशी होती कपिल देव यांची लव्हस्टोरी, वाचा

कपिल देव म्हणाले, 'जेव्हा सुनील गावसकर तिथे आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी बोलत का नाही? अहंकार कुठे आहे? तिथे कोणताही अहंभाव नाही. पण त्यांना वाटते की त्यांना वाटते की आपण चांगले आहोत.'

'कदाचीत ते चांगले असतीलही, पण क्रिकेटचे 50 हंगाम पाहाणाऱ्या व्यक्तीकडूनही ज्यादाची मदत घेतली जाऊ शकते. त्या व्यक्तीला माहिती आहे. कधी कधी ऐकण्याने तुमचे विचार बदलू शकतात.'

दरम्यान, सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशा फरकाने विजय मिळवला आहे. तसेच सध्या सुरू असलेली 3 सामन्यांची वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com