भारताची दुसरी डिव्हिजन लीग, आय लीगने (I League), आतापर्यंत असे अनेक क्लब पाहिले आहेत ज्यांनी आपली फुटबॉलची (Football) आवड जिवंत ठेवली आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपली ताकद दाखवली. मग ते बेंगळुरू एफसी असो, रियल काश्मीर असो किंवा मिनर्व्हा पंजाब असो. यावेळीही आय लीगमध्ये फूटबॉल चाहत्यांना राजस्थान युनायटेड नावाचा असाच एक उत्कट फुटबॉल क्लब पाहायला मिळणार आहे. (Rajasthan United) हा असा क्लब आहे जो काही वर्षांपूर्वी एका अभियंता विद्यार्थ्याने त्याच्या कॉलेजमध्ये सुरू केला होता, पण आता तो राजस्थानची ओळख बनला आहे.
राजस्थानचा इतिहास बघायला गेलं तर फुटबॉलशी काहीही संबंधित नाही. 60 आणि 70 च्या दशकात मगन आणि चेन राजवी यांच्यानंतर राज्याने भारतीय फुटबॉलसाठी कोणतेही मोठी कामगिरी केली नाही. अशा परिस्थितीत राजस्थान युनायटेड क्लबसाठी ही मोठी उपलब्धी आहे. क्लबचे सह-मालक कमल सरोहा यांच्यासाठी ही एक स्वप्नपुर्ती आहे.
कमल सरोहा यांनी कॉलेजमध्ये टीम तयार केली होती
दिल्लीचा रहिवासी असलेला कमल जेव्हा राजस्थानच्या जयपूर शहरात इंजिनीअरिंग करण्यासाठी गेला तेव्हा त्याला जाणवलं की जयपूरला फुटबॉलची तितकीच आवड नाही, जशी त्याला होती. त्याच्या कॉलेजमध्येही फुटबॉल संघ नव्हता. अशा परिस्थितीत महाविद्यालयातील काही फुटबॉलप्रेमींना एकत्र करून त्यांनी क्लब सुरू केला. सुरुवातीला हे लोक फक्त कॉलेजचे सामने खेळायचे. कमलने कॉलेज सोडल्यानंतर हे सामने खेळनेही कमी झाले. मात्र, 2018 साली या क्लबला राजस्थान स्टेट लीगमध्ये खेळण्यासाठी बोलावण्यात आले आणि येथूनच त्याचा प्रोफेशनल प्रवास सुरू झाला.
सरोहा नोकरी सोडून राजस्थानला परतले
सरोहा त्यावेळी गुडगावमध्ये काम करत होते पण फुटबॉलचे प्रेम त्याने सोडले नव्हते. तो नोकरी सोडून जयपूरला परत आला आणि स्पोर्ट्स किट कंपनी सुरू केली. तो राजस्थानमधील छोट्या फुटबॉल क्लबना प्लेइंग किट्स देत होता. यामध्ये एयू राजस्थानचा समावेश होता. ज्याने कमलला आपला संघ राज्य लीगसाठी पाठवण्याचे आवाहन केले जेणेकरून आठ संघांसह ही स्पर्धा आयोजित करता येईल. त्याने या लीगमध्ये असा खेळाडूंची आणि प्रशिक्षकांची री व्यवस्था केली जे पैसे घेणार नाहीत. यानंतर क्लबने आपल्या खेळाडूंना अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी या क्लबवर कोरोनाचा परिणाम झाला होता. मात्र आता पुन्हा जोमाने संघ तयारीला लागला आहे.
स्टेट लीगने संधी दिली
राजस्थान युनायटेडचा संघ यंदाच्या स्टेट लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पहिल्या स्थानावर झिंक क्लबच्या होता, ज्यांना आय-लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र एआयएफएफच्या काही नियमांची पूर्तता न केल्यामुळे त्या संघाला अपात्र ठरवण्यात आले. याच कारणामुळे राजस्थान युनायटेडला सहभागी होण्याची संधी मिळाली. सारोहा आणि बाकीच्या संघ मालकांना आणि प्रशिक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी फार कमी वेळात खेळाडूंचे करार केले आणि आता हा संघ खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.