SA vs NED ODI World Cup 2023 Kagiso Rabada : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात 15 वा सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी हा सामना सोपा असला तरी विश्वचषकात कोणताही सामना सोपा नसतो.
याची झलक आपल्याला इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पाहून मिळाली. दरम्यान, आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने एक खास टप्पा गाठला आहे.
त्याने आता आपल्या संघासाठी वनडेत 150 बळी पूर्ण केले आहेत. आपल्या संघासाठी सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीतही तो पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज शॉन पोलॉक आहे. त्याने 294 सामने खेळून एकूण 387 विकेट्स घेतल्या आहेत. अॅलन डोनाल्ड दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने केवळ 163 सामने खेळून 272 विकेट घेतल्या.
आता कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) 95 एकदिवसीय सामन्यांमध्ये 150 विकेट्स घेण्यास यश मिळवले आहे. आता तो दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक बळी घेणारा नववा गोलंदाज बनला आहे. सध्या त्या संघाकडून खेळणारा एकही खेळाडू त्याच्या पुढे नाही.
आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्स संघाची धावसंख्या 22 असताना सलामीवीर विक्रमजीत सिंग बाद झाला. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. त्याला कागिसो रबाडाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर उर्वरित गोलंदाजांनी विकेट घेतल्या.
आपल्या पहिल्या स्पेलमध्ये रबाडाने 5 षटकात 18 धावा देत दोन खेळाडूंना बाद केले. अशाप्रकारे नेदरलँड्सला बॅकफूटवर ढकलण्यात रबाडाचा मोठा वाटा होता.
दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाने यंदाच्या विश्वचषकात दोन सामने जिंकले आहेत आणि आजचा सामनाही जिंकण्यात तो यशस्वी ठरला तर तो अव्वल स्थानावर पोहोचेल. मात्र, संघाचा नेट रनरेट आधीच चांगला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.