शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जॉय, नेत्रा यांना विजेतेपद

शालेय रॅपिड : 44व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड जागृतीनिमित्त स्पर्धा
44th Chess Olympiad Awareness Competition
44th Chess Olympiad Awareness CompetitionDainik Gomantak

पणजी : महाबलीपुरम-चेन्नई येथे होणाऱ्या 44व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड जागृतीनिमित्त घेण्यात आलेल्या गोवा राज्यस्तरीय 15 वर्षांखालील शालेय बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात शारदा मंदिर स्कूलच्या जॉय काकोडकर याने, तर मुलींत आल्मेदा स्कूलच्या नेत्रा सावईकर हिने विजेतेपद मिळविले.

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ अस्थायी समिती, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने आणि कुजिरा-बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाच्या सहकार्याने स्पर्धा घेतली.

खुल्या गटात जॉयने अव्वल क्रमांक मिळविताना नऊ फेऱ्यांतून आठ गुणांची कमाई केली. नेत्रा हिने विजयी धडाका राखताना सर्व नऊही डाव जिंकले. किंग्ज स्कूलचे एथन वाझ व एड्रिक वाझ या बंधूंचे समान साडेसात गुण झाले. त्यांना खुल्या गटात टायब्रेकरनंतर अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. मुलींत केंद्रीय विद्यालयाच्या अस्मिता रे हिला दुसरा, तर मनोविकास स्कूलच्या दिया सावळ हिला तिसरा क्रमांक मिळाला.

44th Chess Olympiad Awareness Competition
जमीन हडपल्याप्रकरणी अनेकजण ‘रडारवर’ ; एसआयटीकडून तपास सुरू

खुल्या गटात व्हिवान बाळ्ळीकर, साईरुद्र नागवेकर, अनिकेत एक्का, हर्ष नागवेकर, ह्रदय मोरजकर, अथर्व नारायण, चैतन्य गावकर, नवल सावंत, साईराज नार्वेकर, ऋत्विक रायकर, वेदांत आंगले, कविश बोरकर, लव्ह काकोडकर, अवनीश सावंत, सरस पोवार, सर्वांग पाडी, राघव लाड, अर्थ शेणवी कारापूरकर, अर्विन आल्बुकेर्क, अभीर प्रभू, शुभ बोरकर, श्रेयश हवाल यांना अनुक्रमे चौथा ते 25वा क्रमांक मिळाला.

मुलींत आर्या दाभोळकर, अलाना आंद्राद, श्रीया पाटील, वैष्णवी परब, आर्या दुबळे, वालंका फर्नांडिस, लिया सिल्वेरा, जेनिसा सिक्वेरा, सईजा देसाई, श्री घोणसेकर, पुष्टी भोसले, शुब्रा आचार्य, आरवी नाईक, सय्यद महादिया, नव्या नार्वेकर, श्रमा मोरुडकर, रिद्धी गावडे, साची गायक, रिधिमा परब, जेन्सिना सिक्वेरा, सिद्धी नाईक व मैझा सय्यद यांना अनुक्रमे चौथा ते 25वा क्रमांक मिळाला.

बक्षीस वितरण ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू अनुराग म्हामल, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर, स्पर्धा संचालक महेश कांदोळकर, बुद्धिबळ अस्थायी समितीच्या सदस्य अर्चना तेंडुलकर, तसेच आशेष केणी, डॉ. सुशांत धुळापकर, सत्यवान हरमलकर, ॲड. तुकाराम शेट्ये, दत्ताराम पिंगे, अरविंद म्हामल, शिरीष दिवकर, आतिश आंगले, नंधिनी सारिपल्ली-म्हामल यांच्या उपस्थितीत झाले.

बुद्धिबळपटूंना ऑलिंपियाडची संधी

खुल्या गटातील जॉय काकोडकर व एथन वाझ, तर मुलींतील नेत्रा सावईकर व अस्मिता रे यांना चेन्नईतील बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेस उपस्थित राहण्यासाठी निवड झाली आहे. पेडणे येथील रिधिमा परब हिला सरकारी शालेय गटातून संधी मिळाली, खुल्या विभागात सरकारी शालेय गटातील एकही खेळाडू नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com