राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षांचा 'वनवास' संपला, हा विक्रम आहे खास

आयपीएलमध्ये 600 धावा करणारा बटलर हा राजस्थानचा पहिला खेळाडू
jos buttler becomes the first rajasthan royals batsman to score 600 runs in a single ipl season rr vs pbks
jos buttler becomes the first rajasthan royals batsman to score 600 runs in a single ipl season rr vs pbksDanik Gomantak
Published on
Updated on

जोस बटलर आयपीएल 2022 मध्ये चमकत आहे. जेव्हा-जेव्हा हा फलंदाज क्रीझवर येतो तेव्हा धावांचा पाऊस पडतो आणि काही विक्रमलाही तडे जात असतात. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात जोस बटलरने असेच काहीसे केले होते. बटलरने पंजाबविरुद्ध 16 चेंडूत 30 धावा फटकावल्या, पण यादरम्यान तो राजस्थान रॉयल्सच्या एकाही फलंदाजाचा विक्रम गाठू शकला नाही. (jos buttler becomes the first rajasthan royals batsman to score 600 runs in a single ipl season rr vs pbks)

जॉस बटलरने पंजाब किंग्जविरुद्ध 13 धावा करताच त्याने आयपीएल 2022 मध्ये 600 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये 600 धावा करणारा बटलर हा राजस्थानचा पहिला खेळाडू आहे. यापूर्वी अजिंक्य रहाणेने 2012 मध्ये सर्वाधिक 560 धावा केल्या होत्या.

jos buttler becomes the first rajasthan royals batsman to score 600 runs in a single ipl season rr vs pbks
IPL| चहलसह या गोलंदाजांनी घेतल्या 20+ विकेट, पहा कोण आहे टॉप 5 मध्ये

जोस बटलरने पंजाबविरुद्ध 30 धावा केल्या. अशा प्रकारे त्याने आयपीएल 2022 मध्ये 618 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर असला तरी आता तो विराट कोहलीच्या विक्रमाकडे वाटचाल करत आहे. विराट कोहलीने 2016 मध्ये 973 धावा केल्या होत्या आणि असा अंदाज लावला जात आहे की बटलर त्याचा विक्रम मोडू शकतो.

तसे, बटलरने 11 डावांनंतर 618 धावा केल्या आहेत आणि 2016 मध्ये विराट कोहलीने याच डावात 677 धावा केल्या होत्या. जोस बटलरने पंजाब किंग्जविरुद्ध अतिशय आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. रबाडाच्या त्याच षटकात त्याने 20 धावा ठोकल्या होत्या पण शेवटच्या चेंडूवर त्याने रिव्हर्स स्कूप शॉट खेळताना त्याची विकेट गमावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com