International Cricket: भारताची अनुभवी स्टार महिला गोलंदाज झुलन गोस्वामी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. झुलन पुढील महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे. त्यासाठी तिने लंडनमधील लॉर्ड्सचे ऐतिहासिक स्टेडियम निवडले आहे. झुलन 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्सवर खेळल्या जाणार्या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या (England) आगामी मालिकेसाठी झुलनची शुक्रवारी एकदिवसीय संघात निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, झुलनला 2022 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आली होती. तिने श्रीलंकेविरुद्धची (Sri Lanka) वनडे मालिका खेळली नव्हती. झुलन या वर्षी मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये (New Zealand) झालेल्या वनडे विश्वचषकादरम्यान भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळली होती. 2018 पासून तिने T20 सामना खेळलेला नाही. ऑक्टोबर 2021 मध्ये तिने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
दुसरीकडे, झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) सर्व फॉरमॅटमध्ये महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज म्हणून तिची कारकीर्द संपवणार आहे. सध्या तिच्याकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये 352 विकेट्स आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 10 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेने होईल, तर एकदिवसीय मालिका 18 सप्टेंबरपासून खेळवली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.