पेडे-म्हापसा : गतविजेत्या झारखंडचे गुजरातवर वीस गोल

सबज्युनियर हॉकी : हरियाना, उत्तर प्रदेश, मणिपूरचेही एकतर्फी विजय
Hockey News
Hockey News Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : राष्‍ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धेत गतविजेत्या झारखंडने अ गटात गुजरातवर २०-० फरकाने दणदणीत विजय नोंदविला. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर सुरू आहे. स्पर्धेत अन्य लढतीत ब गटात हरियानाने कर्नाटकचा ६-१ फरकाने पाडाव केला. उत्तर प्रदेशने क गटात तमिळनाडूचा २१-० फरकाने धुव्वा उडविला. ड गटात मणिपूरने राजस्थानला १३-० असे लीलया हरविले. ( Jharkhand scored 20 goals against Gujarat)

Hockey News
विजेतेपदासाठी ‘जीनो’ला धेंपो क्लबचे आव्हान

झारखंडच्या सलग दुसऱ्या विजयात अभिषेक टिग्गा याने पाच गोल केले. याशिवाय बिशा लाक्रा याने चार, अमृत तिर्की याने तीन, तसेच अदिसान मिंज, रोहित प्रधान, अमित सोरेंग, अभिषेक तिर्की, असिम एक्का, अभिषेक कुजूर, रोहित तिर्की यांनी प्रत्येकी एक गोल केला. हरियानाच्या विजयात सुनील याने तीन, साहिल, नितीन, राहुल यांनी प्रत्येकी एक गोल केला. हर्षित कुमार याने कर्नाटकचा एकमात्र गोल नोंदविला.

Hockey News
IPL 2022: ''किंग कोहलीने धावा काढण्याचा नवा फॉर्म्युला शोधावा''

उत्तर प्रदेशच्या धडाकेबाज विजयात आकाश पाल व शिवम पटेल यांनी प्रत्येकी चार, मनोज यादवने तीन, अजित यादव, महंमद झैद खान, त्रिलोकी व्हेन्वांशी यांनी प्रत्येकी दोन, राहुल यादव, शाहरुख अली, रझा अली, विशाल पांडे यांनी प्रत्येकी एक गोल केला. बोरिस सिंग व टी. बिक्रमजित सिंग यांचे प्रत्येकी चार, तसेच एस. सॅन्सन सिंग, एस. बोरिस मेतेई, एल. मॅक्स सिंग, के. संजित सिंग, मोईरांगथेम बेनार्जित यांच्या प्रत्येकी एक गोलमुळे मणिपूर हॉकी ने राजस्थानला सहजपणे हरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com