नीरज चोप्रा आणखी एक विक्रम रचण्यासाठी सज्ज, 'वर्ल्ड अ‍ॅथलीट ऑफ द इयर'साठी नॉमिनेट!

Neeraj Chopra: भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला जलवा दाखवून दिला.
Neeraj Chopra
Neeraj ChopraDainik Gomantak
Published on
Updated on

Neeraj Chopra: भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला जलवा दाखवून दिला. भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावून त्याने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले.

या मालिकेत नीरज चोप्रा आणखी एक कामगिरी आपल्या नावावर करण्याच्या मार्गावर आहे. त्याचे नाव वर्ल्ड अॅथलीट ऑफ द इयरसाठी नॉमिनेट झाले आहे.

अशा स्थितीत नीरजला सुवर्णपदक पटकावल्यानंतर अ‍ॅथलीट ऑफ द इयरचा पुरस्कारही मिळू शकतो. त्याची घोषणा 11 डिसेंबरला होणार आहे. नीरज चोप्राने 2023 मध्येच नव्हे तर 2022 मध्येही भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

11 खेळाडू नॉमिनेट झाले

आशियाई क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर जगभरातील 11 खेळाडूंना वर्ल्ड अ‍ॅथलीट ऑफ द इयरसाठी नॉमिनेट केले आहे. वर्ल्ड अ‍ॅथलीट ऑफ द इयरचा किताब कोण पटकावतो याकडे आता भारतासह (India) संपूर्ण जगाचे लक्ष असेल.

या महिन्यात संपलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले. याआधीही नीरजने ऑगस्टमध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथे खेळल्या गेलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.

Neeraj Chopra
Neeraj Chopra: 'फेका तर असे फेका की चार लोक...', नीरजसाठी सेहवागने केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान, नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) नावावर अनेक मोठे रेकॉर्ड्स आहेत. 25 वर्षीय नीरज हा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. गेल्या वर्षी युजीनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावले होते. यंदा मात्र, नीरजने सुवर्णपदक जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com