Javed Miandad: ‘अगर मौत आनी है…’, भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेवरुन जावेद मियांदाद बरळले

Javed Miandad Statement: आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाबाबत भारत-पाकिस्तान यांच्यात गतिरोध आहे.
Javed Miandad
Javed MiandadDainik Gomantak
Published on
Updated on

Javed Miandad Statement: आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाबाबत भारत-पाकिस्तान यांच्यात गतिरोध आहे.

आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने पाकिस्तानबाहेर खेळवले जाऊ शकतात, पण पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात येईल की नाही याबाबत शंकाच आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. आता भारताची पाकिस्तान दौऱ्याची पाळी आहे, असे मियांदाद म्हणाले.

मरण हे ठरल्यावर येईल

एका पाकिस्तानी यूट्यूबरसोबत पॉडकास्टदरम्यान बोलताना मियांदाद म्हणाले की, पाकिस्तानला आजही भारतात जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही. जेव्हा मुलाखतकाराने मियांदाद यांना विचारले की, भारताने पाकिस्तानचा (Pakistan) दौरा करावा का, तेव्हा त्यांनी पटकन उत्तर दिले - त्यांनी नक्कीच यावे. भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेबाबत विचारले असता मियांदाद म्हणाले की- सुरक्षेबाबत कोणतीही चिंता नसावी. आमचा विश्वास आहे की, जर मृत्यू यायचा असेल तर तो आलाच पाहिजे, जीवन आणि मृत्यू अल्लाहच्या हातात आहे.

Javed Miandad
Asia Cup 2023 मधून बाहेर पडल्यास पाकिस्तानचं होणार करोडोंच नुकसान, पीसीबी प्रमुख म्हणाले...

जर त्यांनी आज आम्हाला बोलावले तर आम्ही जाऊ

मियाँदाद म्हणाले की- त्यांनी आज आम्हाला बोलावले तर आम्ही जाऊ. आम्ही गेल्या वेळी गेलो होतो, तेव्हापासून ते इथे आले नाहीत. आता त्यांची पाळी आहे. देशांनी एकत्र काम करुन द्विपक्षीय संबंध सुधारले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

Javed Miandad
Asia Cup 2023: BCCI समोर पाकिस्तानला झुकावं लागणार, आशिया चषकाचे सामने PAK मधून...!

'नरकात जा' असे विधान केले होते

या वर्षाच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांशी बोलताना मियांदाद यांनी भारताला पाकिस्तान दौरा करायचा नसेल तर नरकात जा, असे वादग्रस्त विधान केले होते. बीसीसीआयने (BCCI) गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com