

Jasprit Bumrah And Sanjana Ganesan Blessed With Baby Boy Named Him As Angad:
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाबा झाला असून, त्याने आपल्या मुलाला रामायणातील योद्धा अंगदचे नाव दिले आहे.
बुमराहची पत्नी संजना गणेशने सोमवारी मुलाला जन्म दिला आहे. संजना आणि बुमराह पहिल्यांदाच आई-वडील झाले आहेत. जसप्रीत बुमराहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत बाबा झाल्याची माहिती दिली. यावेळी त्याने आपल्या मुलाचे नाव अंगद ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.
बुमराहने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी संजना आणि मुलाचे हात दिसत आहेत.
हा फोटो शेअर करत बुमराहने लिहिले की, "आमचे छोटेसे कुटुंब मोठे झाले आहे आणि आमची हृदये कल्पनेपेक्षा जास्त आनंदाने भरलेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही सध्या चंद्रावर आहोत आणि आमच्या जीवनाच्या नव्या अध्यायासाठी उत्सुक आहे."
जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मार्च २०२१ मध्ये टीव्ही अँकर आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशनशी लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर संजना आणि बुमराह आई-बाबा झाले आहेत.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाचा सदस्य आहे. तो पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही खेळला होता.
मात्र, मुलाच्या जन्मासाठी बुमराह भारत आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी तो मायदेशी परतला होता. बुमराह आता आशिया कपच्या सुपर-4 फेरीपूर्वी पुन्हा टीम इंडियात सामील होणार आहे.
सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली याचा मुलगा म्हणजे राजपुत्र अंगद होय. बळीचा वध झाल्यावर सुग्रीवाला किष्किंधाचे राज्य मिळाले आणि अंगदला युवराज बनवले गेले.
अंगद देखील हनुमानाप्रमाणे पराक्रमी आणि बुद्धिमान होता. हनुमान, जामवंताप्रमाणे अंगदही जीवनशास्त्रात पारंगत होते. या प्राण विद्याच्या बळावर तो त्याला हवे ते करू शकला.
राजकुमार अंगदने सीतेच्या शोधात वानर सैन्याचे नेतृत्व केले. सीता लंकेत आहे हे कळाल्यानंतर अंगद समुद्रापलीकडे जाण्यास तयार झाला, पण सैन्याचा प्रमुख असल्याने जामवंताने त्याला जाऊ दिले नाही आणि हनुमान लंकेत गेला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.