ISL: ‘कोट्यधीश’ फुटबॉलपटू लिस्टन कुलासो चर्चेत

लिस्टनसाठी मोजण्यात आलेली रक्कम भारतीय फुटबॉलमध्ये (ISL) विक्रमी मानली जाते.
ISL: Liston Colaco
ISL: Liston ColacoFile Image
Published on: 
Updated on: 

पणजी: भारतीय फुटबॉलमधील ‘कोट्यधीश’ फुटबॉलपटू (Football) लिस्टन कुलासो (Liston Colaco) चर्चेतील चेहरा ठरला आहे. प्राप्त माहितीनुसार, त्याला करारबद्ध करण्यासाठी कोलकात्याच्या एटीके मोहन बागानने तब्बल एक कोटी रूपये मोजले असून साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. (ISL)

सासष्टीतील दवर्ली येथील लिस्टनसाठी मोजण्यात आलेली रक्कम भारतीय फुटबॉलमध्ये विक्रमी मानली जाते. या 22 वर्षीय खेळाडूसाठी हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यात सामंजस्य करार झाला. करारानुसार तो जूनपासून स्पॅनिश अंतोनियो हबास लोपेझ यांच्या मार्गदर्शनाखालील कोलकात्यातील संघात रुजू झाला.

ISL: Liston Colaco
सौरव गांगुली होणार तृणमुल कॉंग्रेसचे खासदार ?

खास काय?

एफसी गोवाने (FC Goa) युवा आघाडीपटूस विशेष संधी दिली नाही, कंटाळून तो जानेवारी 2020 मध्ये हैदराबाद एफसी संघात दाखल झाला. तेथे त्याची गुणवत्ता बहरली. साळगावकर एफसीच्या माजी खेळाडूने हैदराबादकडून आयएसएल स्पर्धेत धारदार खेळ केला. वेगवान हालचाली, चेंडूवरील नियंत्रण, चपळता यामुळे गतमोसमात तो मानोलो मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखाली संघातील प्रमुख खेळाडू ठरला.

ISL: Liston Colaco
Goa: इनडोअर क्रीडा संकुले खुली करण्यास क्रीडामंत्री अनुकूल

पहिला गोल

20 फेब्रुवारी 2020 रोजी हैदराबाद एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात लिस्टनने गोल केला. आयएसएल कारकिर्दीतील त्याचा हा पहिलाच गोल ठरला. त्याच सामन्यात लिस्टनने आणखी एक गोल नोंदविला.

"हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. ग्रीन-मरून जर्सीत कोलकात्यात खेळण्याची भावना खूप विशेष आहे. माझ्या फुटबॉल कारकिर्दीत नवा अध्याय सुरू झाला आहे. सर्वोत्तम कामगिरीसाठी कटीबद्ध राहीन."

-लिस्टन कुलासो, एटीके मोहन बागानशी करार केल्यानंतर

"लिस्टन हा खूप खूप चांगला खेळाडू आहे, पण काही वेळा चांगले खेळाडू बेंचवर ठेवावे लागतात. जेव्हा प्रतिस्पर्धी दमतो, तेव्हा लिस्टनची कामगिरी अधिक चांगली होते असं मला वाटते."

- मानोलो मार्किझ, हैदराबाद एफसी प्रशिक्षक. आयएसएल स्पर्धेतील लिस्टनच्या कामगिरीविषयी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com