ISL Football Tournament: एफसी गोवाविरुद्ध ईस्ट बंगाल सामना रंगणार; ''अव्वल स्थानी राहण्यासाठी...''

ISL Football Tournament: एफसी गोवा आणि ईस्ट बंगाल यांच्यातील सामना बुधवारी (ता. 6) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर खेळवला जाईल.
ISL Football Tournament
ISL Football TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

ISL Football Tournament: एफसी गोवा आणि ईस्ट बंगाल यांच्यातील सामना बुधवारी (ता. 6) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर मागील तीन लढतीत एक बरोबरी आणि दोन पराभव यामुळे एफसी गोवाला फक्त एक गुण मिळालेला आहे, मात्र मार्केझ त्यास महत्त्व देण्यास तयार नाहीत. आयएसएलमध्ये होम-अवे लढती तेवढ्या परिणामकारक नाहीत, आमचा संघ घरच्या मैदानावर मजबूत राहील, असे 55 वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शक मार्केझ म्हणाले.

दरम्यान, स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सलग तीन सामने गमावल्यानंतर मागील लढतीत मुंबई सिटीविरुद्ध 1-1 या गोलबरोबरीत एफसी गोवा संघ सावरल्याचे दिसून आले. अव्वल स्थानाचा विचार करता आम्हाला जिंकावेच लागेल. तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकासाठी झगडावे लागेल, असे सांगत एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी ईस्ट बंगालविरुद्धच्या लढतीत वर्चस्व राखण्याचा इरादा मंगळवारी स्पष्ट केला.

ISL Football Tournament
ISL Football Tournament: हेर्रेरा हैदराबादविरुद्ध बेंचवर राहण्याचे संकेत

एक पाऊल प्ले-ऑफ फेरीत

दुसरीकडे, एफसी गोवा संघाचे सध्या एक पाऊल प्ले-ऑफ फेरीत आहे. ओडिशा एफसी आणि मुंबई सिटीने या फेरीतील जागा प्रत्येकी 35 गुणांसह निश्चित केली असून बाकी चार जागांसाठी आता चढाओढ असेल. एफसी गोवाचे सध्या 16 लढतीतून 29 गुण असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. ईस्ट बंगालविरुद्ध पूर्ण गुण मिळाल्यास एफसी गोवाची प्ले-ऑफ फेरी जवळपास निश्चित होईल. कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील कोलकात्याच्या संघाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. 17 सामन्यांतून 18 गुणांसह ते सध्या नवव्या क्रमांकावर आहेत. आपल्या संघाला अजून 15 गुणांची संधी आहे. त्यामुळे प्ले-ऑफसाठीचे आव्हान आटोपल्याचे आपण मानत नसल्याचे कुआद्रात यांनी सांगितले.

मैदानात उतरण्यापूर्वी...

- एफसी गोवाचे 8 विजय, 5 बरोबरी, 3 पराभव, 22 गोल

- ईस्ट बंगालचे 4 विजय, 6 बरोबरी, 7 पराभव, 19 गोल

- पहिल्या टप्प्यात 21 ऑक्टोबर 2023 रोजी भुवनेश्वर येथे एफसी गोवाचा ईस्ट बंगालवर 2-1 असा विजय

- एकमेकांविरुद्ध 7 लढती, एफसी गोवाचे 4, ईस्ट बंगालचा 1 विजय, 2 बरोबरी

- यंदा फातोर्डा येथे घरच्या मैदानावर एफसी गोवाचे 7 सामने, 4 विजय, 1 बरोबरी, 2 पराभव

ISL Football Tournament
ISL Football Tournament: एफसी गोवा धडाकेबाज खेळासाठी सज्ज

संधी मिळण्याची खात्री होती: धीरज

यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील पहिल्या 15 सामन्यात अर्शदीप सिंग एफसी गोवाचा पहिल्या पसंतीचा गोलरक्षक होता. मुंबई सिटीविरुद्ध मागील लढतीत मानोलो मार्केझ यांनी धीरज सिंग मोईरांगथेम याला संधी दिली. २३ वर्षीय मणिपुरी गोलरक्षकाने शानदार कामगिरीने वाहव्वा मिळविली. गुरुवारी पत्रकार परिषदेत त्याने पुनरागमनाविषयी सांगितले, की `मी संधीचा वाट पाहत होतो व ती मिळणार याची खात्री होती. शांत, एकाग्र चित्ताने कामगिरी सुधारण्यावर भर देताना स्वतःवर नियंत्रण राखले.` मार्केझ यांनी धीरजचे कौतुक केले. `अनुकुल निकालांमुळे मी अर्शदीपला झुकते माप दिले हे मान्य करतो, थोडक्यात धीरजला योग्य न्याय देऊ शकलो नाही खरेच आहे. धीरज अतिशय मेहनती असून युवा पिढीसाठी आदर्शवत आहे,` असे मार्केझ म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com