ISL 2023-24: एफसी गोवाची विजयी सुरवात, पण संधीही गमावल्या

कार्लोस मार्टिनेझच्या गोलमुळे पंजाब एफसीवर निसटती मात
FC Goa striker Carlos Martinez
FC Goa striker Carlos MartinezDainik Gomantak
Published on
Updated on

ISL 2023-24 FC Goa Vs Punjab FC Match Updates: सामन्याच्या पूर्वार्धात कार्लोस मार्टिनेझ याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या दहाव्या मोसमातील मोहिमेस अपेक्षित विजयी सुरवात केली, पण त्याचवेळी नवोदित पंजाब एफसीविरुद्ध गमावलेल्या संधीही यजमान संघासाठी सलणाऱ्या ठरल्या.

सामना सोमवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला गेला. एफसी गोवाने १७व्या मिनिटास झालेल्या गोलमुळे १-० असा निसटता विजय प्राप्त केला, तरी आयएसएल स्पर्धेत प्रथमच खेळण्याच्या प्रतिस्पर्धांना त्यांना चांगलेच झुंजविले.

अगोदरच्या लढतीत मोहन बागान सुपर जायंट्सकडून १-३ फरकाने पराभूत झालेल्या पंजाब एफसीचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

एफसी गोवाचा पुढील सामना शनिवारी (ता. ७) फातोर्डा येथेच ओडिशा एफसीविरुद्ध होईल, तर पंजाब एफसी शुक्रवारी (ता. ६) नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध खेळेल.

FC Goa striker Carlos Martinez
Crime News: दोडामार्ग येथील युवकावर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक, पर्वरी पोलिसांची कारवाई

एका गोलचे समाधान

स्पॅनिश खेळाडू कार्लोस मार्टिनेझ याने रेनियर फर्नांडिसच्या शानदार असिस्टवर एफसी गोवास आघाडी मिळवून दिली, परंतु संधी दवडल्यामुळे त्यांना विश्रांतीला एका गोलवर समाधान मानावे लागले.

२३व्या मिनिटास मोरोक्कन नोआ सदोई याला आघाडी वाढविण्याची आयती संधी होती, परंतु गोलनेटसमोर अडथळा नसताना तो नेम साधताना चुकला. पूर्वार्धातील अखेरच्या पाच मिनिटांत एफसी गोवाच्या किमान तीन चांगल्या संधी फोल ठरल्या.

दोन वेळा सदोई, तर एकवेळ रेनियर फर्नांडिसला अटकाव झाला. पंजाब एफसीचा गोलरक्षक किरण लिंबू यानेही दक्षता प्रदर्शित केल्यामुळे एफसी गोवा संघाला चेंडूवर वर्चस्व गोलमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तित करता आले नाही.

३७व्या मिनिटास पंजाबने जवळपास बरोबरी साधली होती, परंतु हुआन मेरा याचा धोकादायक प्रयत्न अगोदर एफसी गोवाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याने रोखला, नंतर बचावपटूही मदतीस आले.

पंजाबचा गोल ऑफसाईड

उत्तरार्धात जय गुप्ता सेटपिसेसवर अचूक हेडिंग साधू शकला नाही, तर कर्णधार ब्रँडन फर्नांडिसही प्रतिस्पर्धी बचाव भेदू शकला नाही. त्यानंतर इंज्युरी टाईममध्ये बदली खेळाडू व्हिक्टर रॉड्रिगेझ याचा प्रयत्न गोलरक्षक किरण याने उधळून लावला.

६४व्या मिनिटास रिबाऊंडवर पंजाब एफसीच्या लुका मासेन याने चेंडूला योग्य दिशा दाखविली होती, परंतु हा गोल ऑफसाईड ठरल्याने एफसी गोवाची आघाडी अबाधित राहिली.

इंज्युरी टाईममध्ये बदली खेळाडू विल्मार जॉर्डन याचा नेम चुकला नसता, पंजाबला बरोबरी साधणे शक्य झाले नाही.

FC Goa striker Carlos Martinez
Goa Cricket: सिद्धार्थकडे यष्टिरक्षणाचीही जबाबदारी; गोव्याचा टी-20 संघ जाहीर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com