Ishan Kishan IPL 2022 Auction: ईशान किशनवर पडला पैशांचा पाऊस

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लिलावात ज्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा होत्या, त्यापैकी एक भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) होता.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लिलावात ज्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा होत्या, त्यापैकी एक भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन होता. यावेळच्या आयपीएल लिलावात 23 वर्षीय ईशान हा सर्वात 'हॉट पिक' मानला जात होता, ज्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीच्या स्पर्धेचा अंदाज वर्तवला जात होता. आणि अखेर तेच झाले. ईशान किशनला (Ishan Kishan) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 15.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. भारतीय संघात दाखल झालेला हा डावखुरा फलंदाज गेल्या वर्षीच मुंबई इंडियन्सने सोडला होता. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने पहिली बोली लावली. त्यानंतर पंजाब किंग्जने (Punjab Kings) बोली लावली. त्यामुळे लगेचच बोली सहा कोटींवर गेली. त्यानंतर गुजरात टायटन्सने बाजी मारली आणि 10 कोटींची बोली पार केली. (Ishan Kishan Became The Most Expensive Player In The IPL 2022 Auction)

दरम्यान, यानंतर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ शर्यतीत सामील झाला. मुंबई आणि हैदराबाद यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. परंतु शेवटी मुंबईने विजय मिळवला आणि ईशान किशनला 15.25 कोटींमध्ये घेतले. भारतीय क्रिकेटमधील सर्वात उज्वल ताऱ्यांपैकी एक असलेल्या आणि आयपीएलमध्ये आपली क्षमता दाखविणाऱ्या इशान किशनने या लिलावात त्याची मूळ किंमत सर्वोच्च ब्रॅकेटमध्ये ठेवली होती. त्याची ही बेस प्राइज 2 कोटी रुपये होती. साहजिकच, सुरुवातीपासूनच इशानसाठी उच्च बोली लागणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. 2016 मध्ये भारतीय अंडर-19 संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या ईशान किशनने गेल्या 4 वर्षांत या लीगमध्ये मोठी झेप घेतली आहे.

Ishan Kishan
IPL 2022 Auction: शाकिब अल हसनने इतिहास रचून फ्रँचायझींना केलं आकर्षित

35 लाखांपासून सुरुवात केली

ईशान किशन 2018 पासून मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र, 2016 च्या लिलावात त्याला पहिल्यांदा गुजरात लायन्सने विकत घेतले होते. केवळ दोन वर्षे आयपीएलचा भाग असलेल्या अहमदाबादस्थित फ्रँचायझीने तत्कालीन 18 वर्षीय इशानला 20 लाखांच्या मूळ किमतीत 35 लाखांची बोली लावून विकत घेतले होते. दोन वर्षे तो या फ्रँचायझीचा भाग होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर 2018 च्या लिलावात आला, जिथे मुंबई इंडियन्सने सर्वांना मागं टाकत ईशानसाठी तब्बल 6.20 कोटी रुपये मोजले होते.

इशानची आतापर्यंतची कामगिरी

भारतीय क्रिकेट संघासाठी 2 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळलेल्या ईशान किशनच्या कामगिरीत आतापर्यंत आयपीएलमध्ये चढ-उतार होत आहे. 2018 आणि 2019 मध्ये त्याने 275 आणि 101 धावा काढल्या होत्या. परंतु 2020 च्या मोसमात इशानने उंची गाठली, जेव्हा यूएईमध्ये त्याने शानदार कामगिरी केली. त्यानंतर इशानने मुंबईसाठी 14 सामन्यांत 57.33 च्या सरासरीने आणि 145.76 च्या स्ट्राईक रेटने 516 धावा केल्या. ईशानने या स्पर्धेत 30 षटकार ठोकले होते. मात्र, शेवटचा हंगाम त्याच्यासाठी फारसा चांगला राहिला नाही. त्याला केवळ 241 धावा करता आल्या. एकूण, या युवा फलंदाजाने 61 सामन्यांमध्ये 1452 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 136 आहे, तर त्याने 9 अर्धशतके केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com