IPL Media Rights: मीडिया हक्कांच्या लिलावाची तयारी सुरू, 'या' कंपन्या सहभागी

कंपन्यांनी मीडिया आणि प्रसारण हक्कांच्या लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खरेदी केली आहेत.
IPL Media Rights
IPL Media RightsDainik Gomantak
Published on
Updated on

IPL Media Rights: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2023 ते 2027 या कालावधीतील मीडिया आणि प्रसारण हक्कांसाठी निविदा काढताच मोठ्या कंपन्यांनी त्यांचे नशीब आजमावण्याची तयारी सुरू केली आहे. Disney, TV-18 Viacom, Sony, Zee, Amazon Prime या कंपन्यांनी मीडिया आणि प्रसारण हक्कांच्या लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खरेदी केली आहेत. (IPL Media Rights Media rights auction begins companies participate)

IPL Media Rights
वीजेशिवाय चालतात हे एसी, दर महिन्याला होते 4 हजारांची बचत

सध्या आयपीएलचे (IPL 2022) प्रसारण हक्क स्टारकडे आहेत. जून 2022 मध्ये मीडिया आणि प्रसारण अधिकारांचा ऑनलाइन लिलाव शक्य आहे. 10 मे पर्यंत आवश्यक कागदपत्रे खरेदी करता येतील. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लिलावात कंपनी अॅपल देखील भाग घेऊ शकते.

यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, "ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक रीतीने ठेवली जाईल, आम्हाला जे काही उत्पन्न मिळेल ते आम्ही भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवू." यावेळी माध्यम आणि प्रसारण हक्कांचा लिलाव खूप खास आहे, तो 4 सेटमध्ये असेल. ज्यामध्ये डिजिटल प्रसारण हक्क, टीव्ही प्रसारण हक्क (भारतीय उपखंड), 18 सामन्यांचा स्वतंत्र संच आणि भारतीय उपखंडाबाहेर, या सर्व संचांचा स्वतंत्रपणे लिलाव केला जाईल. आतापर्यंत हे सर्व पूर्णपणे एकत्र ठेवले होते. बोर्डाने एकूण 32 हजार कोटींहून अधिक रक्कम ठेवली आहे.

आयपीएलच्या 15 व्या हंगामापासून, 10 संघ लीगमध्ये सामील झाले आहेत, यावेळी 74 सामने खेळले जाणार आहेत, त्यामुळे 2023 ते 2027 या पाच वर्षांत 370 सामने होतील. या लिलावात प्रथम प्रसारण हक्क, टीव्ही प्रसारण हक्क (भारतीय उपखंड) लिलाव केले जातील. त्यानंतर उर्वरित दोन संचांचा लिलाव होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com