Video: अरेरे! नो-बॉलवर वॉर्नर झाला आऊट, राशीद खानने दाखवली चतुराई...

IPL 2023: गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला नो-बॉलवर बाद व्हावं लागलं.
Rashid Khan
Rashid KhanDainik Gomantak
Published on
Updated on

David Warner lost his wicket on No ball: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 44 वा सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला नो बॉलवर विकेट गमवावी लागली.

या सामन्यात वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण दिल्लीने सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्या. यात वॉर्नरच्या विकेटचाही समावेश आहे. दिल्लीने सलामीवीर फिलिप सॉल्टची विकेट सामन्याच्या पहिल्या चेंडूवरच गमावली होती. मोहम्मद शमीने त्याला डेव्हिड मिलरच्या हातून झेलबाद केले होते.

Rashid Khan
IPL 2023: LSG vs RCB च्या हाय होल्टेज सामन्यात 'या' धाकडने मोडला लसिथ मलिंगाचा मोठा रेकॉर्ड!

त्यानंतर दुसऱ्या षटकात गुजरातकडून हार्दिक पंड्या गोलंदाजी करण्यासाठी आला होता. पण या षटकात त्याच्यात आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या प्रियम गर्गमध्ये ताळमेळची कमी दिसली.

या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर प्रियमने शॉट खेळल्यानंतर तो चेंडू थेट राशीद खानच्या हातात गेला होता. यावेळी एकेरी धाव घेण्यासाठी वॉर्नर आणि गर्गमध्ये गोंधळ झाला. आणि वॉर्नर खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत पळत गेलेला असताना राशीदने थ्रो करण्याऐवजी पळत येत स्टंपवरील बेल्स उडवल्या.

त्यामुळे वॉर्नरला २ धावांवरच माघारी परतावे लागले. विशेष म्हणजे हार्दिकने हा नो बॉल टाकला होता. पण नॉ बॉलवर फलंदाज धावबाद झाला, तर त्याला माघारी परतावे लागते. त्याचमुळे नो-बॉल असूनही वॉर्नर बाद झाला झाला. त्यानंतरचा चेंडू फ्रि हिट मिळाला.

Rashid Khan
Video Viral: विराट-गंभीरच्या राड्याआधी चाहत्यानं मारलेली मैदानात उडी अन् थेट कोहलीच्या...

दरम्यान, वॉर्नर बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात रिली रोसौला ८ धावांवर बाद केले, तर पाचव्या षटकात मनिष पांडेला १ धावावर आणि गर्गला १० धावांवर बाद केले. त्यामुळे दिल्लीची अवस्था २३ धावा ५ बाद अशी झाली होती.

मात्र नंतर अक्षर पटेल, अमन खान आणि रिपल पटेल यांनी डाव सावरला. अमनने ४४ चेंडूत ५१ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. त्याने अक्षर बरोबर ५० आणि रिलपबरोबर ५३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीला २० षटकात ८ बाद १३० अशी सन्मानजनक धावसंख्या उभारला आली.

गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच मोहित शर्माने २ विकेट्स घेतल्या, तर राशीद खानने १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com