IPL 2023: विराट-गांगुलीने एकमेकांना केलं इग्नोर? सोशल मीडियावरील Viral Video ने उडवली खळबळ

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी एकमेकांशी हात मिळवण्याचे टाळल्याचे दिसले आहे.
Virat Kohli | Sourav Ganguly
Virat Kohli | Sourav GangulyDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli and Sourav Ganguly avoids Shake Hands: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात बेंगलोरने 23 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि दिल्लीचा क्रिकेट संचालक सौरव गांगुली एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले.

या सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हात मिळवत होते. त्यावेळी विराट आणि गांगुली यांनी एकमेकांशी हात मिळवले नाही. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

Virat Kohli | Sourav Ganguly
JioCinema वर मोफत IPL सामने पाहताय? पण लवकरच मोजावे लागणार पैसे, असा आहे मुकेश अंबानींचा प्लॅन

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की विराट दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगशी बोलत असताना गांगुली मागून बाकी खेळाडूंना भेटण्यासाठी पुढे निघून जातो. दरम्यान, या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली असून अनेक चाहत्यांनी असाही अंदाज व्यक्त केला की विराट जाणून बुजून पाँटिंगशी चर्चा करत होता. तर काहींनी गांगुलीने मुद्दाम विराटकडे दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला विराट आणि गांगुली यांच्यात मतभेद झाल्याचे समोर आले होते. ज्यावेळी विराटला टी20 क्रिकेटचे नेतृत्व सोडल्यानंतर वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते, त्यावेळी त्यांच्यातील वाद समोर आले होते.

त्यावेळी गांगुलीने म्हटले होते की त्याने विराटला कर्णधारपद न सोडण्याबद्दल सुचवले होते, पण विराटने याविरोधात विधान करताना म्हटले होते की त्याला कोणीही टी20 क्रिकेटचे नेतृत्व कायम करण्याबद्दल सांगितले नाही.

Virat Kohli | Sourav Ganguly
IPL 2023: भन्नाट! अमन खानने एका हाताने कॅच घेत धोकादायक डू प्लेसिसला धाडले माघारी, पाहा Video

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास या सामन्यात विराटने अर्धशतकी खेळी केली. त्याने 34 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 174 धावा केल्या. दिल्लीकडून मिशेल मार्श आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतली.

त्यानंतर 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 षटकात 9 बाद 151 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मनिष पांडेने 50 धावांची खेळी केली. बेंगलोरकडून विजयकुमार वैशाखने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com