IPL 2023: राजस्थान की पंजाब, कोण होणार स्पर्धेतून 'आऊट'? 'करो वा मरो' मॅचसाठी असे आहेत Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेतील 66 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होत असून दोन्ही संघांसाठी हा 'करो वा मरो'चा सामना आहे.
PBKS vs RR
PBKS vs RRDainik Gomantak

Punjab Kings vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात 66 वा सामना होत आहे. हा सामना पंजाबच्या घरच्या मैदानावर म्हणजेच धरमशालातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी राजस्थान काही मोठे बदल केले आहेत. राजस्थानकडून या सामन्यात आर अश्विन खेळताना दिसणार नाही. त्याच्या पाठीत वेदना होत असल्याने तो हा सामना खेळणार नसल्याचे सॅमसनने सांगितले आहे. राजस्थानने रियान परागला संधी दिली आहे. तसेच पंजाबने त्यांच्या संघात बदल केलेला नाही.

PBKS vs RR
IPL Playoff Equation: बेंगलोरच्या विजयाने मुंबईच्या अडचणीत वाढ, पाहा कसे आहे RCB साठी समीकरण

राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, ऍडम झम्पा आणि ट्रेंट बोल्ट या परदेशी खेळाडूंना खेळवले आहे. तसेच पंजाबने लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि कागिसो रबाडा या परदेशी खेळाडूंना खेळवले आहे.

त्यामुळे राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूलाच वापरता येणार आहे. तसेच पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन परदेशी खेळाडू असल्याने ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय किंवा परदेशी खेळाडू खेळवू शकतात.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राजस्थानने राखीव खेळाडूंमध्ये ध्रुव जुरेल, दोनोवन फेरेइरा, आकाश वशिष्ठ, कुलदीप सेन आणि मुरुगन अश्विन यांना संधी दिली आहे. तसेच पंजाबने राखीव खेळाडूंमध्ये नॅथन एलिस, सिकंदर रझा, ऋषी धवन, मोहित राठी आणि मॅथ्यू शॉर्ट यांना निवडले आहे.

PBKS vs RR
Viral Photo: RCB संघाने IPL चे विजेतेपद जिंकले तर कसे असेल सेलिब्रेशन? पाहा AI ची खास झलक

हा सामना दोन्ही संघांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना आहे. त्यामुळे या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजयाचीच गरज आहे. या सामन्यात जो संघ पराभूत होईल, तो स्पर्धेतूनही बाहेर होईल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • पंजाब किंग्स - शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

  • राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ऍडम झम्पा, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com