IPL 2023: सूर्या-ईशानची बॅट तळपली, मुंबईचा दुसरा विजय! वेंकटेशच्या शतकानंतरही कोलकाता पराभूत

रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलाकाता नाईट रायडर्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवला.
Suryakumar Yadav | Ishan Kishan
Suryakumar Yadav | Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 22वा सामना पार पडला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 5 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्ससमोर 186 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबई इंडियन्सने 17.4 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केला. मुंबई इंडियन्सचा हा या हंगामातील दुसरा विजय ठरला आहे.

Suryakumar Yadav | Ishan Kishan
अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण! गोव्याकडून खेळतो डोमेस्टिक क्रिकेट, पाहा कशी आहे कामगिरी

186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरलेल्या रोहित शर्मा आणि ईशान किशनने डावाची सुरुवात केली. या दोघांनीही दमदार सुरुवात दिली. त्यांनी 65 धावांची सलामी भागीदारी रचली. पण त्यांची जोडी सुयश शर्माने 5 व्या षटकात रोहितला 20 धावांवर बाद करत तोडली.

पण त्यांनतर ईशानला सूर्यकुमारने चांगली साथ दिली. दरम्यान ईशानने तुफानी फटकेबाजी करताना त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतक केल्यानंतर तो 8व्या षटकात 25 चेंडूत 58 धावांची खेळी करून बाद झाला. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याला वरुण चक्रवर्तीने त्रिफळाचीत केले.

पण, त्यानंतर सूर्यकुमार आणि तिलर वर्माने मुंबईच्या फलंदाजीची लय कायम ठेवताना 60 धावांची भागीदारी केली. पण तिलकला 30 धावांवर सुयश शर्माने 14व्या षटकार माघारी धाडले. पण तोपर्यंत मुंबईसाठी विजय सोपा झाला होता.

सूर्यकुमारने टीम डेव्हिडसह डाव पुढे नेला. पण अखेरच्या काही धावा राहिल्या असताना सूर्यकुमारला 43 धावांवर शार्दुल ठाकूरने बाद केले. तसेच नेहल वढेराही 6 धावांवर बाद झाला. पण टीम डेव्हिड (24*) आणि कॅमेरॉन ग्रीन (1*) यांनी मुंबईला विजयापर्यंत पोहचवले.

कोलकाताकडून सुयश शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Suryakumar Yadav | Ishan Kishan
IPL 2023: रोहित शर्मा 'या' कारणामुळे कोलकाताविरुद्ध खेळणार नाही! सूर्यकुमार मुंबईचा नवा कर्णधार

तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताकडून रेहमनुल्लाह गुरबाज आणि एन जगदीशन यांनी डावाची सुरुवात केली होती. पण हे दोघेही फार खास काही करू शकले नाही. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वेंकटेश अय्यरने तुफानी फटकेबाजी केली. त्याने एक बाजू भक्कमपणे सांभाळली होती. पण दुसऱ्या बाजूने नितीश राणा(5), शार्दुल ठाकूर (13) आणि रिंकू सिंग (18) या सामन्यात मोठी खेळी करू शकले नाहीत.

मात्र, वेंकटेशने दमदार खेळ करताना शतक पूर्ण केले. पण त्याला 18 व्या षटकात रिली मॅरेडिथने बाद केले. त्याने 51 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांसह 104 धावांची खेळी केली. अखेरीस आंद्रे रसेल 11 चेंडूत 21 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 185 धावा केल्या.

मुंबईकडून हृतिक शोकिनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. कॅमेरॉन ग्रीन, ड्युआन यान्सिन, पीयुष चावला आणि रिली मॅरेडिथ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com