IPL 2023: 'कॅप्टन' फाफ डू प्लेसिसचे कमबॅक, हेजलवूडलाही संधी! पाहा बेंगलोर-लखनऊचे Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेत सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना होत आहे.
LSG vs RCB
LSG vs RCBDainik Gomantak
Published on
Updated on

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमीयर लीग 2023 स्पर्धेतील 43 वा सामना सोमवारी (1 मे) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळवण्यात येत आहे. हा सामना लखनऊच्या घरच्या मैदानावर म्हणजेच भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या सामन्यातून फाफने कर्णधार म्हणून पुनरागमन केले आहे. त्याने गेले तीन सामने बरगड्यांजवळ झालेल्या दुखापतीमुळे इम्पॅक्ट प्लेअर सब्स्टिट्यूट म्हणून खेळला होता. त्याच्या ऐवजी विराट कोहलीने या तिन्ही सामन्यांमध्ये बेंगलोरचे प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते.

LSG vs RCB
तो परत आला...! IPL 2023 मध्ये करत होता कॉमेंट्री, आता थेट RCB कडून खेळणार सामने

तसेच सोमवारच्या सामन्यासाठी बेंगलोरने आणखी काही बदल संघात केले आहे. बेंगलोरने जोश हेजलवूडलाही संधी दिली असून शाहबाज अहमद ऐवजी अनुज रावतला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर लखनऊने अवेश खानऐवजी कृष्णप्पा गॉथमला या सामन्यासाठी संघात संधी दिली आहे.

या सामन्यात बेंगलोरने प्लेइंग इलेव्हनमध्ये फाफ डू प्लेसिस आणि हेजलवूड व्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल आणि वनिंदू हसरंगा या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच लखनऊने काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन आणि नवीन-उल-हक या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू खेळवले असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूलाच खेळवता येणार आहे.

LSG vs RCB
IPL 2023: मुंबई इंडियन्सची ताकद वाढणार! 'या' वेगवान गोलंदाजाची होणार टीममध्ये एन्ट्री

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी बेंगलोरने हर्षल पटेल, शाहबाज अहमद, विजयकुमार वैशाख, मायकल ब्रेसवेल आणि सोनू यादव या खेळाडूंना राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली आहे, तर लखनऊने आयुष बडोनी, डॅनिएल सॅम्स, अवेश खान, क्विंटन डी कॉक आणि प्रेरक मंकड यांना राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.

  • लखनऊ सुपर जायंट्स - केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गॉथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, यश ठाकूर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com