CSK च्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सने मागितली जयपूरमधील फॅन्सची माफी, जाणून घ्या कारण

चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने स्टेडियममध्ये सामना पाहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची माफी मागितली.
Sanju Samson | MS Dhoni
Sanju Samson | MS Dhoni Dainik Gomantak

Rajasthan Royals Apologize To Fans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्स संघाला ३२ धावांनी पराभूत केले. पण असे असतानाही राजस्थान रॉयल्सने स्टेडियममध्ये सामना पाहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

खरंतर जयपूरमधील स्टेडियम राजस्थान रॉयल्सचे घरचे मैदान आहे. पण गुरुवारच्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात चेन्नई सुपर किंग्सचे आणि त्यांचा कर्णधार एमएस धोनीचे चाहते उपस्थित होते. असे असताना चाहत्यांना धोनीची फलंदाजी पाहायला मिळाली नसल्याने राजस्थान रॉयल्सने त्यांची माफी मागितली आहे.

Sanju Samson | MS Dhoni
MS Dhoni: 'फॅन्सला थँक्यू, कारण...', कॅप्टनकूल पुन्हा निवृत्तीबद्दल बोललाच; ऐकून चाहतेही भावूक

या सामन्यात राजस्थानने चेन्नईला 203 धावांचे आव्हान दिले होते. पण चेन्नईला 20 षटकात 6 बाद 170 धावाच करता आल्या. चेन्नईची सहावी विकेट सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर पडली. त्यामुळे या सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

त्यामुळे राजस्थानने जयपूरमध्ये सामना पाहायला आलेल्या चाहत्यांची माफी मागितली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की 'सवाई मान सिंग स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांची माफी मागतो कारण त्यांना आज #7 (धोनीचा जर्सी क्रमांक) पाहायला मिळाला नाही. पण आशा आहे की घरच्या मैदानावरील पहिल्या विजयानंतर तुम्ही खुश असाल.'

राजस्थान गुणतालिकेत अव्वल

राजस्थानने चेन्नईविरुद्ध विजय मिळवल्यानंतर गुणतालिकेत सध्या अव्वल क्रमांक मिळवला आहे. राजस्थानचा हा या हंगामातील 8 सामन्यांमधील पाचवा विजय होता. तसेच चेन्नईचा हा या हंगामातील 8 सामन्यांमधील तिसरा पराभव होता. चेन्नईनेही 5 सामने जिंकले आहेत.

चेन्नई सध्या गुणतालिकेत राजस्थान आणि गुजरात टायटन्सनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या तिन्ही संघांचे सध्या प्रत्येकी 10 गुण असले, तरी चेन्नईचा नेटरनरेट राजस्थान आणि गुजरात संघांपेक्षा कमी असल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Sanju Samson | MS Dhoni
MS Dhoni: जयपूर का आहे हृदयाच्या खूप जवळ? खुद्द कॅप्टनकूलनेच केला खुलासा

राजस्थानचा विजय

या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 202 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 77 धावांची खेळी केली. तसेच ध्रुव जुरेलने 34 धावांची खेळी केली. चेन्नईकडून तुषार देशपांडेने 2 विकेट्स घेतल्या.

तसेच 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 6 बाद 170 धावा करता आल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाडने 47 धावांची खेळी केली. पण अन्य कोणाला खास काही करता आले नाही. राजस्थानकडून ऍडम झम्पाने 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com