IPL 2023, DC vs GT: पंतची जागा घेणाऱ्या अभिषेकचे पदार्पण! अशी आहे दिल्ली-गुजरातची Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेत मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळवला जात आहे.
David Warner | Hardik Pandya
David Warner | Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Capitals vs Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील सातवा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

David Warner | Hardik Pandya
IPL 2023 व्ह्युवरशीपबाबत धोनीनं मोडला स्वत:चाच रेकॉर्ड, फलंदाजीला उतरताच गाठली नवी उंची

या सामन्यासातून दिल्ली कॅपिटल्स संघातून अभिषेक पोरेलचे पदार्पण झाले आहे. त्याला दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून संघात निवडण्यात आले आहे. आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही खेळण्याची संधी मिळाली आहे. तसेच दिल्ली संघात एन्रिच नॉर्कियाचे देखील पुनरागमन झाले आहे. मात्र, रोवमन पॉवेलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे.

दिल्ली संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नॉर्कियाबरोबरच कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्च आणि रिली रोसौ या परदेशी खेळाडूंना संधी मिळाली आहे.

तसेच गुजरातने देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. त्यांचा प्रमुख फलंदाज केन विलियम्सन पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला असल्याने तो या स्पर्धेतूनच बाहेर झाला आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी गुजरातने त्याच्याऐवजी डेव्हिड मिलरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तसेच साई सुदर्शनला विजय शंकरच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिलरबरोबरच राशिद खान, जोशुआ लिटील आणि अल्झारी जोसेफ या परदेशी खेळाडूंना संधी मिळाली आहे.

David Warner | Hardik Pandya
IPL 2023: 'गौतम आज इतका गंभीर का?', चेन्नईत धोनीने दोन सलग सिक्स ठोकल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

दरम्यान, दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी चार परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूंचाच सामन्यात समावेश केला जाऊ शकतो.

अशी आहे प्लेइंग इलेव्हन -

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ

  • दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, रिली रोसौ, सरफराज खान, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अमन हकीम खान, एन्रिच नॉर्किया, मुकेश कुमार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com